Tuesday, July 2, 2024

Latest Posts

“सरकारला लाज कशी वाटत नाही?” राज्याच्या दरडोई उत्पन्नावरून Jitendra Awhad यांचा Maharashtra Government ला सवाल

महाराष्ट्र राज्य आर्थिक सर्वेक्षण २०२३-२४ नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्य देशभरात सहाव्या क्रामांकावर आले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज्य सरकारवर (Maharashtr Government) जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र राज्य आर्थिक सर्वेक्षण २०२३-२४ नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्य देशभरात सहाव्या क्रामांकावर आले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून राज्य सरकारवर (Maharashtr Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) टीका करत,”राज्यात नवीन उद्योग आणणं सोडा, पण राज्यातील उद्योग सुद्धा दुसऱ्या राज्यात पाठवून राज्याला केवळ संकटात टाकण्याचं काम हे सरकार करतंय,” अशी ट्विटर पोस्ट केली आहे.

जितेंद्र आव्हाड नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विविध मुद्यांवर भाष्य करत असतात. यावेळी, नुकत्याच प्रकाशित झालेल्या राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण २०२३-२४ मध्ये दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशभरातून सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. यावरून भाष्य करत ते म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संघर्षातून राज्याला मदतीचा हात देत वृद्धिदर उंचावला होता; तोच आता महायुती सरकार जनतेच्या अडचणींपासून अनभिज्ञ राहण्याच्या स्वभावाने कमी करत आहे. या सगळ्यात राज्याचं नुकसान तेवढं होतंय. महाराष्ट्र राज्य आर्थिक सर्वेक्षण, २०२३-२४ नुकताच प्रकाशित झाला. त्यानुसार, दरडोई उत्पन्नात देखील राज्य आता ६ व्या क्रमांकावर आले आहे. राज्यात नवीन उद्योग आणणं सोडा, पण असलेले उद्योग सुद्धा दुसऱ्या राज्यात पाठवून रोजगार कमी करण्यास सरकारने हातभारच लावलाय. राज्याला केवळ संकटात टाकण्याचं काम हे सरकार करतंय.”

आपल्या दुसऱ्या एका ट्विटर पोस्ट मधे देशातील राज्यांची दरडोई उत्पन्न यादी प्रसारित करत “सरकारला लाज कशी वाटत नाही?” असा सवाल विचारला आहे. सोबत जोडलेल्या यादीत “दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर असून गुजरात राज्य महाराष्ट्राच्याही पुढे आहे,” असे लिहिले आहे.

देशभरातील राज्यांची दरडोई उत्पन्नाची यादी प्रकाशित झाली असून तेलंगणा राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तेलंगणाचे दरडोई उत्पन्न ३ लाख ११ हजार ६४९ आहे. कर्नाटक राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून ३ लाख ४ हजार ४७४ इतके दरडोई उत्पन्न आहे. हरयाणाचे दरडोई उत्पन्न २ लाख ९६ हजार ५९२ असून हरयाणा देशभरातून तिसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडू राज्य चौथ्या क्रमांकावर असून २ लाख ७५ हजार ५८३ इतके दरडोई उत्पन्न आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर गुजरात असून २ लाख ७३ हजार ५५८ इतके दरडोई उत्पन्न गुजरातचे आहे. या यादीत महाराष्ट्राचा टॉप ५ राज्यात समावेश झाला नसून २ लाख ५२ हजार ३८९ इतक्या दरडोई उत्पन्नासह महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा:

Maharashtra Assembly Monsoon Session मध्ये कोणाची उपस्थिती? काय घडलं खास?

‘ना ना करते प्यार …’ Uddhav Thackeray यांची Devendra Fadnavis यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss