spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सरन्यायाधीशपदा साठी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नाव निश्चित; ९ नोव्हेंबरला शपथ घेणार

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या निवृत्तीनंतर ते या पदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रपतींनी डॉ. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची ९ नोव्हेंबर २०२२ पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.

राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड ९ नोव्हेंबरपासून पदभार स्वीकारणार असून ते देशाचे ५० वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असेल. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड याची ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.

 देशाचे सध्याचे सरन्यायाधिश यू. यू. लळीत यांनी २६ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ केवळ ७४ दिवसांचा असून ते ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवत उत्तराधिकाऱ्याचे नाव पाठवण्याबाबत कळवले होते. त्यानुसार लळीत यांनी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर आज अखेर राष्ट्रपतींनी चंद्रचूड यांच्या नावावर शिक्कमोर्तब केले असून, येत्या ९ ऑक्टोबरपासून चंद्रचूड देशाच्या सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. यू. यू. लळीत यांनी २७ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पाच हजार प्रकरणे निकाली काढली आहेत. तसेच जुने खटले तत्काळ मार्गी लागावेत म्हणून त्यांनी लिस्टिंग सिस्टम सुरू केली आहे.

मे २०१६ मध्ये न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत. सर्वाधिक काळ CJI राहण्याचा विक्रमही वायव्ही चंद्रचूडच्या नावावर आहे. १९७८ ते १९८५ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले आहे. १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे शबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या प्रकरणांसह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये न्यायाधीश राहिले आहेत.

हे ही वाचा :

PM Modi : नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्टही केलं जाहीर, जाणून घ्या ‘ही’ खास योजना

भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला; देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss