कर्पुरी ठाकूर , लालकृष्ण आडवाणी ही दोन्ही नावे अतिशय योग्य – शरद पवार

भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना (Lal Krishna Adwani) यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कर्पुरी ठाकूर , लालकृष्ण आडवाणी ही दोन्ही नावे अतिशय योग्य – शरद पवार

भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना (Lal Krishna Adwani) यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे सगळ्यांकडून अभिनंदन केले जात आहे. भारतरत्न जाहीर झाल्यानंतर दोन्ही नावं अतिशय योग्य असून थोडा उशीर झाला पण योग्य निवड आहे, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. त्यावेळी बोलतांना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडले आहे.

शरद पवार म्हणाले, भारतरत्न जाहीर झालेली कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण आडवाणी दोन्ही नवे अतिशय योग्य आहेत. अडवाणी देशाच्या संसदेत अनेक वर्ष होते. भाजपचे नेते, संसदेचे सदस्य, मंत्री म्हणून आदर्श काम करत आहेत. थोडा उशीर झाला पण योग्य निवड आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्णी अडवाणी संसदेत अनेक वर्षे होते. त्यांचा पराभव कधी झाला नाही, रथयात्रा काढली तेव्हा एकदा मतभेद झाले.थोडा उशीर झाला पण योग्य निवड आहे. त्यांना सन्मान मिळाला आहे,आता समाधान व्यक्त करतो. त्यांच्या पक्षात काय घडले याच्या खोलात जात नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. त्यानंतर शरद पवार उल्हासनगर गोळीबार प्रकरणांवर बोलताना, सत्तेचा गैरवापर केला जात आहे. कायदा हाती घेणाऱ्यांना मोकळीक दिली जात आहे. सरकारची बघ्याची भूमिका असेल तर राज्य कोणत्या दिशेला जात आहे याचा विचार केला पाहिजे. कायदा हातात घेणाऱ्या विरोधात गैरवापर होत आहे. राज्य सरकारची सगळ्या बाबतीत बघण्याची भूमीका घेते असे वाटते. अशा गोष्टी महाराष्ट्र नागरिकांच्या दृष्टीने चिंताजनक आहे, असे शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येत आहेत. जसे गुजरातला सगळे देण्यासाठी ते धैर्य दाखवत असतात तसे महाराष्ट्र राज्याला पण द्यावे. आमच्याकडे राज्यसभा जागा लढवण्यासाठी संख्याबळ नाही, बहुमत नसल्याने आम्ही प्रयत्न करणार नाही. रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर बोलताना शरद पवार म्हणाले, घरच्या एका व्यक्तीला कोणी घेऊन गेले.चौकशीला तर आपण जात नाही का? मग त्यात हे सगळे कुटुंबीय गेले कुठे बिघडले, असे शरद पवार म्हणाले.

Exit mobile version