व्हायरल व्हिडिओ : शाळेतील ‘या’ चिमुकल्याचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात एक चिमुकला वर्गात बसून खूप रडतोय आणि...

व्हायरल व्हिडिओ : शाळेतील ‘या’ चिमुकल्याचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
१५ जून पासून शाळांना पुन्हा सुरुवात झाली आहे. अशातच अनेक लहान मुलांचे शाळेतील पहिल्या दिवसाचे फोटो आणि व्हिडिओ नेटकर्यांकडून सोशल मीडियावर शेअर केले जातात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात एक चिमुकला वर्गात बसून खूप रडतोय आणि माझ्या बापाला फोन करून बोलवा असं हात जोडून विनवण्या करताना दिसून येतोय.
माझं घर जवळच आहे मला सोडा, मला जाऊद्या माझं म्हणणं तरी ऐका, असं तो वारंवार त्याच्या शिक्षकांना बोलत आहे. त्याच्या अशा बोलण्याचा व्हिडिओ देखील शिक्षक गमतीत मोबाईलवर चित्रित करत आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना फार आवडला असून हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. मुलाचं बोलणं आणि रडणं पाहून अनेकांना हसू आवरता येणं शक्य होत नाहीये.
हा व्हिडीओ पाहुन अनेक नेटकऱ्यांना त्यांच्या शाळेतल्या पहिल्या दिवसाच्या गमतींची आठवण झाली आहे. अनेकांनी या व्हिडीओ ला कमेंट्स केल्या असून व्हिडीओ शेअर देखील केला आहे. पालकांनी आपल्या मुलांना पहिल्यांदा शाळेत पाठवताना किंवा दीर्घ विश्रांतीनंतर खूप काळजी घ्यावी. मुलांना नवीन वातावरणाशी जुळवून घेणं सोपं नसतं आणि म्हणूनच तुम्हाला त्यांच्यासोबत खूप मेहनत करावी लागेल. अशा प्रतिक्रिया देखील काहींनी व्हिडिओ खाली दिल्या आहेत.
Exit mobile version