धुळयात ८८ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लुटून ,तरुणीचे अपहरण

धुळयात ८८ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लुटून ,तरुणीचे अपहरण

धुळे जिल्ह्यातील साक्री येथे पाच ते सात दरोडेखोरांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून सोने चांदीच्या दागिन्यांसह २३ वर्षीय तरुणीचे अपहरण केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राहत्या घरातून तरूणीचे अपहरण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एका घरात अज्ञातांनी दरोडा टाकून ८८ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लुटून लांबवत तरुणीचे अपहरण केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेतील दरोडेखोरांनी तोंडाला मास्क बांधून ते हिंदीतून बोलत असल्याचे महिलेने सांगितले आहे.

काही तासातच सहा संशयीत ताब्यात
साक्री शहरातील नवापूर रस्त्यावरील भांडणे शिवारात असलेल्या सरस्वती कॉलनीत वास्तव्यस असलेल्या ज्योत्स्ना पाटील (40 वर्षे) आणि त्यांची भाची निशा शेवाळे या दोघी घरात टीव्ही पाहत असताना घराचा दरवाजा ठोठावण्याचा त्यांना आवाज आला. घराचा दरवाजा उघडला असता घरात सहा अज्ञातांनी प्रवेश करत या दोघींना धारदार शस्त्राचा धाक दाखवला. त्यांच्या कपाटातील तिजोरीतून सुमारे 88 हजार पाचशे रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच ज्योत्स्ना पाटील यांचे हातपाय बांधून निशा शेवाळे अपहरण करून तिला सोबत घेऊन गेले. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासातच सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

घरी एकटी असल्याने भाचीला बोलावले
ज्योत्सना पाटील यांचे पती काही कामानिमित्त पाटील हे संगमनेर येथे गेले होते. ज्योत्सना घरी एकट्या असल्याने त्यांनी भाची निशा शेवाळे हिला झोपण्यासाठी घरी बोलावून घेतले. निशा एका मेडिकल शॉपमध्ये काम करते. निशा व ज्योत्सना रात्री जेवण करून गप्पा करत बसल्या असता रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी तोंडाला मास्क लावले होते. तसेच त्यांच्या हातात बंदूक आणि चाकू होता. दरोडेखोरांनी कपाटातील दागिने तर पळवले पण अंगावरील दागिने देखील हिसकावून घेतले.

हे ही वाचा:

Health Supplements: कोणी घ्यावीत? किती घ्यावीत?

THANE: बांधकाम साहित्यात १२ फुट लांबीचा अजगर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version