Sunday, July 7, 2024

Latest Posts

Jitendra Awhad यांच्या ‘त्या’ वादावर Kiran Mane यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडून महाड येथे मनुस्मृती दहन आंदोलनादरम्यान अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची प्रतिमा फाडली गेली. यावरून अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडून महाड येथे मनुस्मृती दहन आंदोलनादरम्यान अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची प्रतिमा फाडली गेली. यावरून राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. विरोधकांनी राज्यभर निदर्शने आणि आंदोलने करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत स्पष्टीकरण देत माफीही मागितली आहे, अश्यातच आता अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेते किरण माने यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाडांकडून अनवधानानं जी चूक झाली ती गंभीरच होती… डाॅ. आंबेडकरांनी ‘मनूस्मृती’ जाळल्याची आठवण पुन्हा ताजी व्हावी हा हेतू स्तुत्य होता…पण अशा आंदोलनात जे करायचे आहे त्याची योग्य ती खबरदारी न घेतल्याचा रागही आला. खुप वाईटही वाटले. तो व्हिडीओ पहावतही नव्हता. पण… या निमित्तानं सतत अर्वाच्य शब्दांत ट्रोलींग करणार्‍या भक्ताड पिलावळीला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जो पुळका आलेला आहे… तो पाहून आता जाम हसू यायला लागलंय !”

किरण माने पुढे म्हणाले, “आव्हाडांनी माफी मागीतली इथं विषय संपला खरंतर… पण त्यानंतरही यांचा जो थयथयाट सुरू आहे तो फार विनोदी आहे. खरंतर या पिलावळीला कुणी सिरीयसली घेत नाही. त्यांच्या निषेधाला महत्त्व तेव्हा मिळालं असतं जेव्हा एका धोतरवाल्या बेडकानं महात्मा फुले-सावित्रीबाईंची उघड उघड टवाळी केली होती तेव्हाही ते इतकेच पेटून उठले असते. त्यांच्या निषेधाला महत्त्व तेव्हा मिळालं असतं, जेव्हा एका किळसवाण्या झुरळानं महात्मा गांधींच्या मातेच्या चारित्र्याचे हनन केले होते तेव्हा त्यांची संतापानं लाहीलाही झाली असती. त्यांच्या निषेधाला महत्त्व तेव्हा मिळालं असतं, जेव्हा एका दाढीवाल्या बोकडानं माता जिजाऊबद्दल वाईटसाईट लिहीलं होतं तेव्हा त्याचे थोबाड फोडले असते.”

“जितेंद्र आव्हाड यांच्या निमित्ताने शिवशाहूफुलेआंबेडकरांची सतत बदनामी करणार्‍या पिलावळीला आता झालेली उपरती आणि त्यांचा उच्छाद आमचे मनोरंजन करत आहे हे नक्की,” असे त्यांनी पोस्टच्या शेवटी म्हंटले.

हे ही वाचा:

आव्हाड यांच्या कृतीचे राज्यभरात पडसाद ; Jitendra Awhad यांच्यविरोधात महायुती आक्रमक

Jitendra Awhad यांच्या मदतीला धावल्या Sushma Andhare, ‘त्या’ प्रकरणावरून केले मोठे वक्तव्य!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss