spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष कार्यालयात न आल्याने किशोरी पेडणेकर यांनी केली खंत व्यक्त

मुंबईच्या माजी महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पडणाऱ्या पावसाचा आढावा घेतला आहे.

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर(Kishori pednekar)यांनी मुंबईत पडणाऱ्या पावसाचा आढावा घेतला आहे. मुंबईच्या हिंदमाता परिसरात यंदाच्या वर्षी पाणी साचण्याचे प्रमाण कमी असल्याने कुठेतरी दिलासादायक चित्र पाहायला मिळाले अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

मुंबई महानगरपालिकेचे गेले पाच वर्षापासून ज्या प्रकल्पावर ती काम सुरू होते त्यामुळे यंदा दादर आणि हिंदमाता परिसरात पाणी कमी साचले आहे, असे त्यांनी म्हटले.”काल राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिली. एकूणच मुंबईची स्थिती पाहता त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले”. अधिकाऱ्यांशी चर्चा करत संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतल्याची माहिती किशोरी पेडणेकर(Kishori pednekar)यांनी दिली.

त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या वर्तणुकीबाबत एक खंत व्यक्त केली.
त्या म्हणाल्या एकनाथ शिंदे यांनी प्रथमच मुंबई महानगरपालिकेला भेट दिली. एकनाथ शिंदे हे स्वतःला शिवसैनिक म्हणवतात परंतु ते काल शिवसेना पक्ष कार्यालयात आले नाहीत तर भाजप पक्ष कार्यालयात त्यांनी भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही हार तुरे आणले होते. हार तुरे वाया गेले याची खंत नाही मात्र त्यांचे हे वागणे अपेक्षेच्या पलीकडचे होते. अशी खंत शिवसेना नेता किशोरी पेडणेकर(Kishori pednekar)यांनी दिली.

भावा बहिणीने केलं लग्न, पुढे घडला विचित्र प्रकार

Latest Posts

Don't Miss