Kolhapur Flood: पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, बापट कॅम्प परिसरात पाणीच पाणी…

पंचगंगा पाणी पातळी ४४ फुटांवर जाताचं शाहूपुरी इथल्या कुंभार गल्ली येथे पाणी शिरले असून अनेक घरांमध्ये पाणी गेले आहे. कोल्हापूरातील २०१९  आणि २०२१  साली आलेल्या दोन महापुरांचा अनुभव पाहता जेव्हा पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ४३ फूट होते, तेव्हाच पन्हाळा रस्त्यावर पाणी येते.

Kolhapur Flood: पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, बापट कॅम्प परिसरात पाणीच पाणी…

गेल्या आठवड्यापासून सगळीकडे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने सोमवारी २२ जुलै रोजी आपली इशारा पातळी गाठून धोका पातळीकडे वाटचाल सुरु केली होती. पंचगंगेने गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास आपली धोका पातळी ओलांडली असून सध्या पंचगंगा ४३ फूट इंचावरून वाहत आहे. काल (२५ जुलै) सकाळी आठच्या सुमारास राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पातळी ४३ टक्के इतकी होती तर जिल्ह्यातील तब्बल ८४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून कोल्हापुरात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

पंचगंगा पाणी पातळी ४४ फुटांवर जाताचं शाहूपुरी इथल्या कुंभार गल्ली येथे पाणी शिरले असून अनेक घरांमध्ये पाणी गेले आहे. कोल्हापूरातील २०१९  आणि २०२१  साली आलेल्या दोन महापुरांचा अनुभव पाहता जेव्हा पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ४३ फूट होते, तेव्हाच पन्हाळा रस्त्यावर पाणी येते. परंतु यंदा यात मोठा फरक पडला असून राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ४१ फुटांवर असतानाच पन्हाळा रस्त्यावर पाणी आले आहे. पंचगंगेने ४४  फुटांची पातळी गाठताच शहरात पाणी घुसायला सुरवात झाली आहे. बापट कॅम्प परिसरातही अनेक घरात पाणी गेले असून, कुंभारांचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर पोहोचले आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अलमट्टी धरणातून तीन लाख पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळालाय.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पंचंगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत असली तरी कालच्या (दि. २५ जुलै) पावसाने राधानगरी १०० टक्के पाणी भरले आहे. त्यामुळे धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. पावसाचा जोर वाढल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही तासात धरणाचे पाणी पंचगंगेला पोहोचल्यास तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहे.

 

मला गद्दारांना पाडायचं आहे, Uddhav Thackeray यांनी आदेश दिल्यास निवडणूक लढवणार: Chandrakant Khaire

Gharoghari Matichya Chuli: जानकी-ऋषिकेशच्या लग्नसोहळ्यातील खास लूकने वेधले सर्वांचे लक्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version