spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kolhapur Heavy Rain : राधानगरी धरण भरलं, तर पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी

गेल्या २-३ दिवसांपासून संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. एककीकडे राज्यात सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब होऊन पूरस्थिती निर्माण झाली.

मुंबई :- गेल्या २-३ दिवसांपासून संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. एककीकडे राज्यात सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब होऊन पूरस्थिती निर्माण झाली. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे काही धरणं भरली असून काही धरणं भरण्याच्या वाटेवर आहेत. यातच कोल्हापूरकरांसाठी हि एक आनंदाची बातमी आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण (Radhanagari Dam) हे पूर्ण १०० टक्के भरले आहे आणि त्यामुळे यंदा कोल्हापूरकरांच्या पाण्याची चिंता हि जवळपास मिटलीच आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने (Panchganga River) पहिल्यांदाच इशारा पातळी गाठली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ३९ फूट ८ इंच इतकी आहे. त्यामुळे नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ७१ बंधारे पाण्याखाली गेले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान स्वयंचलित दरवाजे असलेले राधानगरी हे देशातील पहिले धरण आहे. राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. या धरणाची उंची ३८.४१ मीटर आहे, तर लांबी १०३७ मीटर आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी ७ स्वयंचलित दरवाजे बसवले आहेत. ज्यावेळी राधानगरी धरण हे १०० टक्के भरेल, त्यावेळी याच दरवाजातून पाण्याचा विसर्ग होतो.राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक ६ आज पहाटे साडेपाच वाजता उघडला आहे. या दरवाज्यातून प्रतिसेकंद १४२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. तर दुसरीकडे पॉवर हाऊसमधून १६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. सध्या राधानगरी धरणातून एकूण ३०२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. खबरदारी म्हणून भोगावती नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राधानगरी धरणाचे इतर स्वयंचलित दरवाजे देखील उघडण्याची शक्यता हि वर्तवली जात आहे आहे.

हे ही वाचा :-

शिंदे गटातील मंत्र्यांना भाजपचा विरोध ?

Latest Posts

Don't Miss