मुश्रीफांच्या अडचणीत वाढ, पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथा पालथ पाहायला मिळत आहे.

मुश्रीफांच्या अडचणीत वाढ, पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथा पालथ पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संताजी घोरपडे साखर कारखाना फिर्यादी व इतर लोकांना भागभांडवल देतो असे सांगून फसवणूक केली असल्याचे फिर्यादी विवेक विनायक कुलकर्णी यांनी आपल्या जबाबत नोंदवले आहेत. या घटनेनंतर मुश्रीफ यांच्या विरोधात मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरेकडे आमदार हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांकडून हा गुन्हा खोटा असल्याच सांगितलं जात आहे. तसेच या प्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यातच कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. आमदार मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, तसेच काही शेतकरी मुरगूड पोलिस ठाण्याकडे आले. चुकीची व बिनबुडाची तक्रार शहानिशा न करता कशी दाखल करून घेतली, त्यासाठी कोणती कागदपत्रे पुरवण्यात आली, असा जाब सहायक निरीक्षक बडवे यांना विचारला. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. संतप्त कार्यकर्त्यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात हुकूमशाही सुरू झाल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या हे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. कोल्हापूरात येऊन सोमय्यांनी मुश्रीफांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनतर राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली होती. इडी चौकशीतून मुश्रीफ यांना दिलासा मिळून काही दिवस उलटले नाही तर आता पुन्हा मुश्रीफ हे अडचणीत अडकले आहेत.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर दाखल करण्यात आलेला हा गुन्हा हा पूर्णपणे खोटा असून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. या फिर्यादी विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी मुरगूड पोलीस ठाण्यातच आपला ठिय्या मांडला आहे.

हे ही वाचा :

Madhya Pradesh मध्ये भीषण अपघात, अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या तीन बसला भीषण अपघात

ठाकरे गटाची आजपासून राज्यभरात ‘शिवगर्जना’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version