पाऊस वाढवणार कोल्हापूरकरांची धास्ती; राधानगरी धरणाचे ३ स्वयंचलित दरवाजे उघडले

राधानागरी धरणाच्या उघडलेल्या या तिन्ही दरवाज्यातून आतापर्यंत एकूण ७४८४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे.

पाऊस वाढवणार कोल्हापूरकरांची धास्ती; राधानगरी धरणाचे ३ स्वयंचलित दरवाजे उघडले

वाढत्या पावसामुळे कोकणासह कोल्हापुरात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापुरातील घाटामाथ्यावर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी धरणातील पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे आज (दि. ११) सकाळी ११च्या सुमारास राधानगरी धरणाचा ६ नंबरचा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला. यानंतर पाठोपाठ तासाभराच्या अंतराने अजून दोन दरवाजे उघडल्याची माहिती देण्यात आली.

गेल्या चोवीस तासांत कोल्हापुरात ७९ मीमी पाऊस झाला असून जूनपासून आज अखेर पर्यंत ३९१३ मीमी पावसाची नोंद झाली आहे. राधानागरी धरणाच्या उघडलेल्या या तिन्ही दरवाज्यातून आतापर्यंत एकूण ७४८४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. तर कसबा बावडा येथील राजाराम बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात चौथ्यांदा राजाराम बंधाऱ्यावरून पंचगंगेचे पाणी वाहत आहे. याचबरोबर जिल्ह्यातील अन्य बंधारेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच या सतत बरसणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरातील नद्यांना पूर येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

संपूर्ण कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला असून रविवार आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याशी शक्यता वर्तविली आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, महाड, कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

हे ही वाचा:

सुशांतचे ‘ब्रह्मास्त्र’ बॉलीवूडला उद्ध्वस्त करणार… सोशल मीडियावर या पोस्टची चर्चा

मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा, शिवसेनेचे अरविंद सावंत यांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version