२० सप्टेंबरपासून कोकणकन्या एक्सप्रेस कात टाकणार

२० सप्टेंबरपासून कोकणकन्या एक्सप्रेस कात टाकणार

कोकण रेल्वेमार्गावर धावणारी कोकणकन्या म्हणजे कोकणी माणसांचा विकपॅाईंट. गणेशोत्सव आणि उन्हाळा सुट्टीच्या काळात तर कोकणकन्याची आरक्षित तिकीटे हाती पडणारा कोकणी माणूस नशीबवानच. आता ही प्रवाश्यांची लाडकी कोकणकन्या सुपरफास्ट वेगात धावणार आहे. २० तारखेपासून कात टाकणारी कोकणकन्या तिच्या वेगामुळे प्रवाश्यांचे दोन तास वाचवणार आहे मात्र तिच्यातील या बदलामुळे तिचं तिकीट आणखी दुर्मिळ होणार नाही ना अशी भिती सिंधुदुर्गवासियांना वाटत आहे.

रोज धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस दि. २० सप्टेंबरपासून सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून धावणार आहे.दि.२० पासून कोकणकन्या विद्युत इंजिनसह धावणार असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. यामुळे कोकणकन्या एक्सप्रेसच्या एकूण प्रवासात तब्बल दोन तास दहा मिनिटे बचत होणार आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरील प्रवासी रेल्वे गाड्या या महिन्यापासून टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिन सहचालवला जाणार आहेत.

कोकणकन्या एक्सप्रेस आतापर्यंत १०११२ व १०१११ या क्रमांकासह धावत होती. आता दिनांक २० सप्टेंबरपासून ही गाडी डिझेल ऐवजी विद्युत इंजिनवर धावणार असून एक्सप्रेस ऐवजी ती आता सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून लावणार आहे. या गाडीचा क्रमांक देखील बदलला असून आता वेगवान झालेली कोकणकन्या एक्सप्रेस २०१११/२०११२ या क्रमांकासह धावेल.

हेही वाचा : 

उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी, शिंदे कोणाची भेट घेणारा?

ही गाडी आतापर्यंत मडगाव येथून सायंकाळी ४ वाजून पन्नास मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी मुंबईतील सीएसएम टी स्थानकावर पोचत होती. आता ही गाडी मडगाव येथून दोन तास दहा मिनिटे उशिराने सुटणार. दिनांक २० पासून ही गाडी मडगाव येथून सायंकाळी ४.५० ऐवजी सात वाजता सुटणार आहे. असे असले तरी मुंबईत सीएसएमटी स्थानकावर ती आधीच्याच पाच वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचणार आहे. थोडक्यात कोकणकन्या एक्सप्रेस विजेवर धावणार असल्याने तिच्या एकूण प्रवासात दोन तास दहा मिनिटांची बचत झाली आहे.

सुपरफास्ट कोकण कन्या एक्सप्रेस दिनांक २० पासून सावंतवाडीला रात्री आठ वाजून ३६ मिनिटांनी, कुडाळला रात्री ०८.५८ यांनी कणकवलीला रात्री नऊ वाजून २८मिनिटांनी, राजापूरला १०. १४ मिनिटांनी, रत्नागिरी स्थानकावर रात्री ११ वाजून१५ मिनिटांनी, चिपळूणला मध्यरात्री नंतर एक वाजून २८ मिनिटांनी तर खेड्लाती ती रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल.

महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न; अजित पवार स्पष्टच बोलले

मुंबई सीएसएमटीहून मडगावकडे येताना सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेस २०१११ आधीप्रमाणे रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी सुटणार असून पनवेल पर्यंत या डाऊन गाडीच्या वेळापत्रकात बदल झाला असला तरी गाडी स्पीडअप झाल्यामुळे खेड स्थानकावर ती आधीच्या पहाटे तीन वीस ऐवजी तीन वाजून चार मिनिटांनी येईल. चचिपळूणला कोकण कन्या एक्सप्रेस आधी ०३.५८ न्यायची मात्र आता ती सुपरफास्ट झाल्यामुळे तीन वाजून ३० मिनिटांनी येईल. संगमेश्वरला डाऊन कोकण कन्या आधी पहाटे चार वाजून ३८ मिनिटांनी यायची आता ती चार वाजून दोन मिनिटांनी येईल. सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर पूर्वीच्या पाच-पंचवीस ऐवजी चार वाजून पंचवीस मिनिटांनी येईल. मुंबईवरून येताना कणकवलीला पूर्वी कोकणकन्या एक्सप्रेस ०७. ५२ आणि पोहोचायची आता ती सहा वाजून४३ मिनिटांनी पोहचेल. पूर्वी कोकणकन्या एक्सप्रेस दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी मडगावला पोहोचत असे. आता ती दुपारी ऐवजी सकाळी ०९.४६ मडगाव ला आपला प्रवास संपवणार आहे.

नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मंदिर आता २२ तास खुले राहणार

Exit mobile version