Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Ladki Bahin Yojna : “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेसाठी आजपासून ऑफलाईन अर्ज सुरु

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजपासून ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकाळ पासूनच महिलांनी कार्यालयाबाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. 

२८ जून रोजी अर्थमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी राज्याचं अर्थसंकल्प सादर केलं. अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या. पण त्यात महिलांना/ मुलींना अधिक प्राधान्य देत त्यांच्यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. त्यातच “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ” ही योजना वयोगट २१ ते ६० वयोवर्ष असलेल्या पात्र महिलांसाठी दरमहा दीड लाख रुपये दिले जाणार आहेत. यावर्षी २ लाख ५० हजार ५०० रुपये पेक्षा कमी उत्पन्न असा निकष करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर १०० रुपयांच्या स्टॅंम्प पेपरवर शपथपत्र द्यावं लागणारं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजपासून ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकाळ पासूनच महिलांनी कार्यालयाबाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

“मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना” ही योजना सुरु केल्यानंतर अनेक महिलांनी राज्यसरकारवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. या योजनेसाठी २१ ते ६० वयोवर्ष असलेल्यांना वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार ५०० रुपये पेक्षा कमी हवं आणि आपलं बॅंक खातं असणं आव्श्यक आहे. सोबतच महाराष्ट्रात राहणाऱ्या अशा तर विधवा, विवाहित, घटस्फोटित, निराधार महिला, अशा महिला देखील पात्र असणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरातील सेतू केंद्रावर त्याचबरोबर विदर्भातील बुलढाण्यात महिलांनी कार्यलयाबाहेर लाखोंच्या संख्येने गर्दी केली आहे.

पण या योजनेसाठी अर्ज कसा भरावा ?

  • लाभार्थ्यांचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला महत्त्वाचा आहे.
  • कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. (वार्षिक उत्पन्न २.५० लाखापर्यंत )
  • पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशनकार्ड
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना या योजनेमुळे पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. तर यासाठी ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला, २.५०  लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, घरात कुणीही आयतकरदाता असल्यास,जर कुटुंबातील कोणी ही सरकारी नोकरीवर असेल किंवा पेन्शनवर असेल आणि त्याचबरोबर ५ एकरपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरतील.

हे ही वाचा:

Maharashtra Monsoon Assembly 2024: ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार, Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Lonavala Bhushi Dam Tragedy: पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमक्या उपाययोजना काय?: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss