spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बिबटयापासून वाचण्यासाठी जळगावमधील लताबाईंनी केली पाण्यात १६ तास मृत्यूशी झुंज

चोपडा तालुक्यातील कोळंबा येथे लताबाई कोळी नावाच्या महिलेसोबत थरराक घटना हगडल्याचे समोर आले आहे. लताबाई (Latabai Koli) नावाच्या महिलेनं 16 तास सलग पाण्याच्या प्रवाहात मृत्यूशी झुंज दिली. लताबाई तापी नदीकाठावर आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या असताना एक कुत्रा धावत येत होता आणि त्या कुत्र्या मागे बिबट्या धावत येताना सुद्धा दिसला. बिबट्या आपला शिकार करणार या भीतीने लताबाईंनी पाण्यात उडी मारली. ६० किलोमीटर लताबाई कोळी या पाण्याचा प्रवाहात वाहत वाहत अमळनेर तसेच पाडळसरे धरण ओलांडून थेट तालुक्याच्या सीमेवरील निम नदी तीरावर दुसऱ्या दिवशी नाविकाना केळीच्या खोडाला मिठी मारलेल्या जिवंत अवस्थेत आढळून आल्या.

आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?, किशोरी पेढणेकरांचे खोचक वक्तव्य

लताबाईंना केळीच्या खोडाने आधार दिला. चोपडा तालुक्यातून वाहत वाहत लताबाई सोळा तास 60 किलोमीटर अंतर अंमळनेर तालुक्यात आल्या. तिथे काठावर आल्यानंतर स्थानिक लोकांना लताबाईंना दवाखान्यात नेलं. नंतर लताबाईंच्या कुटुंबीयांना यांची माहिती देण्यात आली. मग लताबाई सुखरुप घरी परतल्या.

लताबाई घरी परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. लताबाईंचं औक्षण करुन त्यांचं उत्सहात स्वागत करण्यात आले. देवाच्या आशीर्वादामुळे त्या घरी परतल्या, अशी भावना त्यांच्या नातेवाईंकानी व्यक्त केली आहे. आपले जीव वाचवल्याबद्दल खुद्द लताबाई यांनीही देवाचे आभार मानले आहेत. हा घटनाक्रम ऐकताना, काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय लताबाईंच्या कुटुंबीयाना आला.

हे ही वाचा:

कोलकात्यात भाजपच्या निषेदाला हिंसक वळण

भारतात सर्वाधिक ट्विटर अकाऊंटवरील फॉलोअर्सच्या संख्येत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss