Thursday, July 4, 2024

Latest Posts

Laxman Hake Hunger Strike: लक्ष्मण हाके यांचे उपोषण मागे, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम

गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचे उपोषण आज (शनिवार, २२ जून) अखेर त्यांनी मागे घेतले आहे.

गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचे उपोषण आज (शनिवार, २२ जून) अखेर त्यांनी मागे घेतले आहे. राज्य सरकारच्या (Maharashtra Government) शिष्टमंडळाने जालन्यातील वडीगोद्री (Vadigodri) या उपोषणस्थळी भेट देऊन ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांच्याशी चर्चा केली. हि चर्चा यशस्वी ठरली असून गेली १० दिवस सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. उपोषण जरी मागे घेतले असले तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

लक्ष्मण हाके यांची समजूत काढण्यात राज्य सरकार यशस्वी झाले असून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) कोणताही धक्का लागणार नाही, तसेच लक्ष्मण हाके यांच्या इतर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे.

यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, “बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर आणि घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले आहे. त्यानुसार, त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि ते जाहीर करावं. या सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. पंचायत राजच्या निवडणूका आता ओबीसी आरक्षण देऊन घेणार कि त्याशिवाय घेणार हे शासनाने स्पष्ट करावे. अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार असून त्यामध्ये चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल. सरकारने आश्वासन दिले आहे, पण केवळ त्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आता ते फक्त तात्पुरतं स्थगित केलं आहे.”

हे ही वाचा

आमची लढाई सुरूच, संपलेली नाही, Chhagan Bhujbal यांचा नारा

Laxman Hake Hunger Strike:ओबीसींचा आवाज…’लक्ष्मण हाके’ आहेत तरी कोण ?

आरक्षणप्रश्नी BJP कडून मराठा आणि OBC समाजाची फसवणूक: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss