Sunday, July 7, 2024

Latest Posts

Maratha Reservation ओबीसींमधून नको या मागणीसाठी Laxman Hake यांचे आमरण उपोषण, सरकारी शिष्टमंडळाने दिली भेट

ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Lakshman Hake) हे सुद्धा आमरण उपोषणाला बसले असून मागील पाच दिवसांपासून त्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. 'ओबीसी आरक्षण बचाव' चा नारा देत जालना जिल्ह्यातील वडीगोद्री (Vadigodri) येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण (Hunger Strike) करून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आंदोलन काही दिवसांपूर्वी स्थगित झाले. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या भेटीनंतर त्यांनी राज्य सरकारला १ महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. अश्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Lakshman Hake) हे सुद्धा आमरण उपोषणाला बसले असून मागील पाच दिवसांपासून त्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. ‘ओबीसी आरक्षण बचाव’ चा नारा देत जालना जिल्ह्यातील वडीगोद्री (Vadigodri) येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी (Antrawali गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडीगोद्री या गावामध्ये लक्ष्मण हाके गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारने (Maharashtra Government) मराठा समाजाला आरक्षण द्यावे परंतु ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न पोहोचवता स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, “सरकारने खुशाल मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मात्र ते ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून न देता स्वातंत्र आरक्षण द्यावे. जेणेकरून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मात्र सरकार व काही मराठा नेत्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसी आरक्षण लाटण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. हे चुकीच आहे आणि त्यालाच वाचा फोडण्यासाठी राज्यातील कोट्यवधी ओबीसी समाज हा लोकशाही मार्गाने ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मागील पाच दिवसापासून मी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.”

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून एक शिष्टमंडळ मुंबई येथून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावात दाखल झाले. उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करत ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही तुम्ही उपोषण सोडा अशी हाक सरकारच्या वतीने या ठिकाणी भेटीसाठी आलेले मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे माजी मंत्री भागवत कराड यांनी केली मात्र आम्हाला लेखी आश्वासन द्या त्यानंतरच आम्ही उपोषण सोडू अशी ठाम भूमिका यावेळी उपोषण करते लक्ष्मण हाके यांनी घेतली सुमारे 15 ते 20 मिनिटे चाललेल्या या चर्चेनंतर उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना सरकारच्या वतीने मुंबई येथे येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून लवकरच यावर काहीतरी तोडगा निघेल अशी माहिती मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा

सगे-सोयऱ्याचा जो विषय आहे त्याची…Maratha Reservation वर Ashok Chavan काय म्हणाले?

सरकारमधील मंत्री केवळ लोकप्रियतेसाठी घोषणा करतात, Supriya Sule यांचा निशाणा कोणावर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss