spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बिबट्याने महिलेवर केला हल्ला

संगमेश्वर तालुक्यातील नजीकच्या वाशी सहाणेची वाडी येथे आज, सोमवारी सकाळी बिबट्याने थेट घरात शिरत महिलेवर हल्ला केला. 

बिबट्या घरात शिरून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यात घडली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यावेळी ग्रामस्थांनी महिलेला बाहेर काढल्याने बिबट्या घरातच अडकला. आणि जिवितहानी टळली. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संगमेश्वर तालुक्यातील नजीकच्या वाशी सहाणेची वाडी येथे आज, सोमवारी सकाळी बिबट्याने थेट घरात शिरत महिलेवर हल्ला केला.
या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी त्या महिलेला बाहेर काढले. अन् बिबट्या घरातच अडकला. जखमी महिलेला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तर, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. गेल्या काही दिवसापासून वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे.
मात्र आता वन्यप्राण्यांकडून नागरिकांवर भेट हल्ले होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. वनविभागाने यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहेविविध कारणांमुळे संगमेश्वर तालुक्यात गेल्या एका वर्षात ५ बिबटे, १ सांबर, ५ गवारेड्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तालुका वनविभागाने याला दूजोरा दिला आहे.जखमी महिलेला संगमेश्वर मधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss