Mumbai Local Train : लोकल सेवा खोळंबली, अंबरनाथ-बदलापूर दरम्यान तांत्रिक बिघाडमूळे प्रवाशांचे हाल

Mumbai Local Train : लोकल सेवा खोळंबली, अंबरनाथ-बदलापूर दरम्यान तांत्रिक बिघाडमूळे प्रवाशांचे हाल

कल्याणवरून कर्जतकडे जाणारी रेल्वे सेवा सध्या उशीराने सुरू आहे. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही लोकल सेवा उशीराने सुरू आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक विलंबाने सुरू आहे. मागच्या एका तासापासून ही वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे प्रवाशांना या त्रासातून जावं लागत आहे.

यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, “S-३ सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती करत तांत्रिक बिघाड दूर केला आहे. त्यानंतर सकाळी ७.५० वाजता रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. तसेच धुक्यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मोबाईलच्या अतिवापर केल्याने, आरोग्यावर होतील परिणाम

तांत्रिक बिघाड दूर होऊनही इतर लोकल गाड्यांच्या वेळेपत्रकावर परिणाम

गर्दीच्या वेळी अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान तांत्रिक अडचणीमुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला होता. एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ही लोकल बंद पडली होती. रेल्वेच्या एक तासाच्या प्रयत्नानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली. मात्र मध्य रेल्वेचा वेळापत्रक कोलमडलेलं आहे.

हेही वाचा : 

खोके घेतल्याच्या आरोपांमुळे बच्चू कडू संतापले, ‘आता शिंदे – फडणवीसांनीच स्पष्ट करावे’ कडूंचे आव्हान

रेल्वेनं तात्काळ दुरुस्त करून ही लोकल पुढे पाठवली. मात्र या तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. सीएसएमटी आणि कर्जतकडे जाणाऱ्या काही लोकल या तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदलापूर स्थानकावर सध्या लोकलची वाट बघत प्रवासी ताटकळत उभे आहेत. आता हे वेळापत्रक रुळावर येण्यासाठी किती वेळ लागेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशातच लोकल सेवा पूर्ववत झाली असली तरी लोकल काही काळ विलंबानंच धावत आहेत. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागत आहेत.

Diwali 2022 : यंदा तुळशी विवाह कधी ? जाणून घ्या शुभ मुहूर्त…

Exit mobile version