Loksabha MP Oath Ceremony: Balasaheb Thackeray यांचे शपथेदरम्यान स्मरण केले Nagesh Patil Ashtikar यांना शपथ घेण्यापासून रोखले…

नागेश पाटील आष्टीकर हे मराठीत शपथ घेत होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाचा उल्लेख केला असताना हंगामी लोकसभा अध्यक्षांनी त्यावर आक्षेप घेतला. आणि दुरुस्ती सुचवत पुन्हा शपथ घेण्यास सांगितले.

Loksabha MP Oath Ceremony: Balasaheb Thackeray यांचे शपथेदरम्यान स्मरण केले Nagesh Patil Ashtikar यांना शपथ घेण्यापासून रोखले…

आज (मंगळवार, २५ जून) संसद भवन येथील नवनिर्वाचित खासदारांचा स्पपथविधी सोहळ्याचा (Loksabha MP Oath Ceremony) दुसरा दिवस पार पडत आहे. परंतु, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे (Hingoli Loksabha Constitueny) शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांच्या शपथेवर आक्षेप घेण्यात आला. नागेश पाटील आष्टीकर हे मराठीत शपथ घेत होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाचा उल्लेख केला असताना हंगामी लोकसभा अध्यक्षांनी त्यावर आक्षेप घेतला. आणि दुरुस्ती सुचवत पुन्हा शपथ घेण्यास सांगितले.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शपथेवर आक्षेप घेण्यात आला. नागेश पाटील आष्टीकर हे मराठीमधून शपथ घेत होते. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे स्मरण केले. त्यावर हंगामी लोकसभा अध्यक्ष भर्तृहरि महताब (Bhartruhari Mahtab) यांनी आक्षेप घेतला आणि दुरुस्ती सुचवत शपथ घेताना जे लिहिलं आहे त्यांनुसारचह शपथ घेणं आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार नागेश पाटील आष्टीकर यांनी पुन्हा एकदा मराठीतून शपथ घेतली.

शपथेदरम्यान नक्की काय म्हणाले नागेश पाटील आष्टीकर?

नागेश पाटील आष्टीकर यांनी मराठीतून शपथ घेतली. शपथ घेताना त्यांनी सुरुवातीला म्हंटल कि, “मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडुन आलो असल्याने दत्त महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व माझे वडील बापूराव पाटील आष्टीकर यांना स्मरून शपथ घेतो कि, मी विधिद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि भारतीय एकात्मतेचे स्मरण करेन. जे कर्तव्य मला प्राप्त होते, ते नेकीने पार पाडेन.”

नागेश पाटील आष्टीकर यांना शपथेदरम्यान का रोखण्यात आले?

आष्टीकर शपथ घेत असताना हंगामी लोकसभा अध्यक्ष भर्तृहरि महताब यांनी त्यांना थांबवले आणि जे पत्रकार लिहिलं आहे तेच वाचण्यास सांगितले. यावेळी त्यांनी, “असं चालणार नाही. जे लिहिलं आहे तेच वाचावं लागेल. तशीच शपथ घ्यावी लागेल,” असे सांगितले. त्यानंतर, नागेश पाटील आष्टीकर यांनी अन्य नावांचा उल्लेख टाळत पुन्हा एकदा शपथ घेतली.

हे ही वाचा

वचन देते की, मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या….काय म्हणाल्या Varsha Gaikwad?

आपल्या खासदारांची कामगिरी वृद्धिंगत होईल, Supriya Sule यांचा विश्वास

Nilesh Lanke यांनी घेतली इंग्रजीमधून शपथ, Sujay Vikhe यांना अप्रत्यक्ष टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version