spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोल्हापुरात मनी लॉन्ड्रिंगच्याच पैश्याची लूट

स्पेशल २६ या चित्रपटानंतर आयकर विभाग किव्हा सीबीआयच्या नावाचा वापर करून खोटे कागतपत्र तयार करून घरावर बनावट छापा पडू शकतो हे उघड झाले त्यानंतर खोटे सीबीआय , पोलीस , आयकर विभागाचे अधिकारी बनून घरांची लूट करण्याच्या अशा अनेक घटना समोर आल्या होत्या . आता अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे . आयकर अधिकारी असल्याचे सांगून कोल्हापुरात ८०लाख लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .

कोल्हापुरातील लूट करणाऱ्या व्यक्तीला पैश्याची मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या एका टोळीवर संशय आला , सुरुवातीला त्याने त्याची तक्रार आयकर विभागाकडे केली नंतर पोलिसांकडे केले पण त्याला दोन्हीकडून प्रतिसाद न मिळाल्याने मनी लॉन्ड्रिंगची रक्कम स्वतःच लुटायचा कात रचला . त्यासाठी त्याने स्वतःबरोबर मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या व्यक्तीच्या दोन नोकर आणि काही गरजू लोक याना सहभागी करून घेतले.

मनी लॉन्ड्रिंगकरणारी व्यक्ती कोल्हापुरातील मुक्तसैनिक वसाहतजवळ पैसे घेऊन येणार होता याची माहिती लूट करणाऱ्या या व्यक्तीला आधीच मिळाली होती . त्याने या वसाहतीजवळ व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला अडवण्यासाठी आपल्या साथीदारांना पाठवले . त्याच्या साथीदारांना गाडीमधील रक्कम दिसली लूट करणाऱ्याचे साथीदार त्या व्यक्तीला चौकशीचे कारण सांगून दुसरीकडे सुनसान ठिकाणी घेऊन गेले त्याच्याकडील पैशांची बॅग हिसकावून घेत सर्व लुटेर्यानी पळ काढला आयकर अधिकारी असल्याचे भासवून ही लूट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे . त्यानंतर याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. लुटीची रक्कम मोठी असल्याने पोलिसांना पाळत ठेवून हा प्रकार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तपासासाठी विविध पथके रवाना केली होती. लुटीमधील एकाही संशयित आरोपीचे कुठल्याही गुन्हेगारीचे रेकॉर्ड नाही. केवळ पैशांची गरज आणि मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवायचा म्हणून ही लुट केली होती. कोल्हापूर पोलिसांकडून या सर्व आरोपीना अटक करण्यात आली आहे .

हे ही वाचा :

Andheri Election : अंधेरी पूर्व मतदारसंघात ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान, सात उमेदवार रिंगणात कोणाचा होणार विजय?

दोन-तीन प्रकल्प कुठे गेले हे आरटीआयमधून समोर आलं आहे ; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss