राज्यभरात कमी पावसाची नोंद, ‘एल निनो’चा हवामानावर परिणाम

राज्यात मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो.

राज्यभरात कमी पावसाची नोंद, ‘एल निनो’चा हवामानावर परिणाम

राज्यात मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी भारतामध्ये २०१८ नंतर सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली आहे. ‘एल निनो’ हवामानाच्या पॅटर्नमुळे (El Nino weather pattern) राज्यभरात ऑगस्ट महिना हा कोरडा गेला. ऑगस्ट महिना कोरडा गेल्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. एल निनो हे पॅसिफिक पाण्याची तापमानवाढ आहे. यामुळे भारतीय उपखंडात कोरडी परिस्थिती असते.

जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात फक्त सरासरी ९४ टक्के पावसाची नोंद झाली. २०१८ नंतरची ही सर्वात कमी पावसाची नोंद आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने निवेदनात म्हटले आहे. आयएमडीने एल निनोचा मर्यादित प्रभाव गृहीत धरून हंगामात ४ टक्के पावसाची तूट अपेक्षित धरली होती. यावर्षी राज्यात पावसाचे आगमन उशिरा झाले. जून जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर पुन्हा ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्यात सरासरी १३ टक्के पाऊस झाला. तर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये सरासरी पेक्षा जास्त तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील पिकांना पाणी देण्यासाठी पाऊस पडणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यभरात पडलेल्या कमी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. देशातील काही भागात सिंचनाच्या अभाव आहे. त्यामुळे पाऊस पडणे अत्यंत महत्वाचे आहे.

राज्यभरात कमी प्रमाणात पडलेल्या पावसाचा फटका महागाईवर सुद्धा झाला आहे. साखर, डाळी, तांदूळ आणि भाजीपाला यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. तांदूळ, गहू आणि साखरेचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या भारताला जागतिक अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्यात आला आहे.

Exit mobile version