LPG Cylinders: LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता वर्षाकाठी केवळ १५ सिलेंडर मिळणार

रगुती एलपीजी ग्राहकांना (Domestic LPG Consumers) आता सिलेंडर जपून वापरावा लागणार आहे. आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे.

LPG Cylinders: LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता वर्षाकाठी केवळ १५ सिलेंडर मिळणार

घरगुती एलपीजी ग्राहकांना (Domestic LPG Consumers) आता सिलेंडर जपून वापरावा लागणार आहे. आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात आता फक्त १५ सिलेंडर मिळणार आहेत.

घरगुती एलपीजी ग्राहकांना १५ पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन (Non Subsidy Connection) असलेल्या ग्राहकांना हवं तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात ठराविक म्हणजेच, केवळ १५ सिलेंडर मिळणार आहेत.

घरगुती एलपीजी सिलेंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलेंडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच, याची तातडीनं अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच, यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अनुदानित घरगुती गॅसचं रीफिल हे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या रिफिलहून महाग असल्यानं अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस रीफिलचा वापर केला जातो. यासंदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्यानं घरगुती एलपीजी सिंलेडरवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

त्याचबरोबर एका महिन्याचा कोटाही आता निश्चित करण्यात आलाय. कोणत्याही ग्राहकाला एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेता योणार नाहीत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवो तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात केवळ १५ सिलेंडरच मिळणार आहेत.

अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना या दराने वर्षभरात फक्त १२ सिलेंडर मिळणार आहेत. तर यापेक्षा जास्त सिलेंडरची गरज असल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलेंडर घ्यावे लागेल. तर, नवीन नियमांनुसार, रेशनिंग अंतर्गत असलेल्या एका कनेक्शनवर एका महिन्यात फक्त दोनच सिलेंडर मिळणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही संख्या एका वर्षात १५ पेक्षा जास्त सिलेंडर असू शकत नाही. एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त पैसे द्यावे लागत असतील, तर त्याचा पुरावा देऊन ग्राहकाला तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. तरच त्या ग्राहकाला अतिरिक्त सिलेंडर मिळू शकतो.

हे ही वाचा:

Rain Updates : परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु; मराठवाड्यात पिकांचं नुकसान

सर्वसामान्यांचे बजेट गडबडलं; कोथिंबिरीचा दर गगनाला भिडला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version