यंदा जनतेला महाडाचं ‘दिवाळी गिफ्ट’

मुंबईत (Mumbai) घरं घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सर्वात मोठा आधार म्हणजे म्हाडा (MHADA). मात्र गेल्या तीन वर्षांत म्हाडानं मुंबईतल्या घरांसाठी लॉटरी (MHADA Lottery) काढली नाही.

यंदा जनतेला महाडाचं ‘दिवाळी गिफ्ट’

मुंबईत (Mumbai) घरं घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सर्वात मोठा आधार म्हणजे म्हाडा (MHADA). मात्र गेल्या तीन वर्षांत म्हाडानं मुंबईतल्या घरांसाठी लॉटरी (MHADA Lottery) काढली नाही. मात्र ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण दिवाळीत मुंबईमध्ये चार हजार घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडानं तयारी सुरु केली आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.

त्यामुळे तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. पहाडी-गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी आणि कोळे-कल्याण या ठिकाणी ही घरे असतील. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश करू नये, असा निर्णय म्हाडानं घेतला होता. मात्र, आता चालू प्रकल्पातील येत्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात बांधकाम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकेल अशा घरांचा सोडतीत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसंदर्भात घोषणा केली होती. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. दिवाळीत ३००० घरांची सोडत निघेल, असे सांगितलं होते. एका वृत्तपत्राशी बोलताना म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिवाळीत मुंबईतील अंदाजे चार हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश करू नये, असा निर्णय म्हाडानं घेतला होता. पण आता चालू प्रकल्पातील म्हणजेच, येत्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात बांधकाम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकेल, अशा घरांचा सोडतीत समावेश केला जाणार आहे.

हे ही वाचा :-

भारतातील पहिल्या महिला भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ ॲना मणी यांची १०४ वी जयंती

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version