spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आता मुलुंडला येणार? हालचालींना वेग

मुंबईची ओळख मानले जाणारे महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalakshmi Race Course) हलवण्याच्या बाबती आता वेग आल्याच दिसून येत आहे. महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेकरार १० वर्षांपूर्वी संपुष्टात आला असून आता या भूखंडावर थीमपार्क (theme park) उभारण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईतच पण दुसरीकडे हलविण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

दक्षिण मुंबईतल्या महालक्ष्मीऐवजी आता रेसकोर्स मुलुंडमधल्या डम्पिंग ग्राऊंडवर (Dumping ground in Mulund) नेण्याचा प्रस्ताव आहे. मुलुंडचा डम्पिंग ग्राऊंडचा परिसर हा साधारणपणे २४ हेक्टरचा (24 hectares) असल्याचं सांगितलं जात आहे. काही वर्षांपूर्वीच रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचं (Royal Western India Turf Club) लीज संपले आहे. त्यामुळे या जागेचा ताबा पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी मुंबई महानगर पालिकेनी (Mumbai Municipal Corporation) राज्य सरकारला लवकरच पत्र लिहिणार आहे. मात्र रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला बदली जागा देण्यात येणार आहे.

जर महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड येथे स्थलांतरित करण्यासाठी बीएमसीला खासगी जमीन (Private land) संपादित करावी लागेल.त्यानंतर ती मुलुंड डम्पिंग ग्राऊंडशी जोडावी लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. खाजगी जमीन खरेदी करून ती रेसकोर्ससाठी सुपूर्द करणे शक्य होणार नाही. रेसकोर्स चालवणे हा सार्वजनिक उद्देश नसल्यामुळे, खाजगी जमीन खरेदी करण्यासाठी सार्वजनिक पैसा खर्च करण्यास विरोध होऊ शकतो, असं वरिष्ठ अधिकारी (senior officer) यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

दक्षिण मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य असे थीम पार्क उभारण्याचे स्वप्न शिवसेनेचे होते. शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी तसा ठराव मांडल्यानंतर मुंबई महानगरपालिका सभागृहाने मंजूर केला होता. मात्र त्यावर त्यावेळेच्या राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र भाडेकरार संपून दहा वर्षे झाल्यानंतर हा विषय चांगलाच तापला आहे.

हे ही वाचा:

सरकार अस्तित्त्वात नाही असं दिसतंय , संजय राऊतांचा हल्लाबोल

नारायण राणेंचा हल्लाबोल, संजय राऊत ठाकरेंचा चपलेने मार खाणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss