कारशेड विरोधात ‘आरे’ मध्ये महामोर्चा

मुंबई मेट्रोच्या आरेतील कारशेडविरोधातील पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत वृक्षतोड थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

कारशेड विरोधात ‘आरे’ मध्ये महामोर्चा

कारशेड विरोधात 'आरे' मध्ये महामोर्चा

मुंबई :- मुंबई मेट्रोच्या आरेतील कारशेडविरोधातील पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत वृक्षतोड थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या आरेतील कारशेड आणि काही दिवसांपूर्वी येथे करण्यात आलेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. रविवारच्या आंदोलनात ‘आप’ आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होऊ लागले आहेत. शिवसेना, काँग्रेसचा ही ‘आरे वाचवा’ आंदोलनाला पाठींबा आहे. आता ‘वंचित’नेही ‘आरे वाचवा’, ‘झाडे वाचवा’ची हाक दिली आहे. आप कार्यकर्ते झाडांना राखी बांधत आंदोलनं करणार आहेत. आरे जंगलातील वृक्षतोड आणि मेट्रो कारशेडला पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम आहे. दरम्यान आरेमध्ये पुढील निर्देशापर्यंत कोणतीही वृक्षतोड न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. महामोर्चाच्या माध्यमातून वंचितचे कार्यकर्ते आरे आंदोलनात सहभागी होत असून या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर करीत आहेत. पर्यावरणप्रेमी, सर्वसामान्य मुंबईकरांसोबतच आता विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांही आरे वाचवा आंदोलनात सहभागी होऊ लागले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाने या प्रकरणाची सविस्तर सुनावणी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या प्रकरणाची सुनावणी योग्य खंडपीठासमोर घेण्याबाबत १० ऑगस्ट रोजी सुनावणी होईल असे खंडपीठाने म्हटले. दरम्यान, न्यायमूर्ती ललित यांनी सुनावणी दरम्यान या प्रकरणाची सुनावणी इतर खंडपीठासमोर घेण्याबाबत म्हटलं आहे.

आरेमध्ये दर रविवारी सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. मात्र पर्यावरणप्रेमींच्या विरोधाला न जुमानता सरकारने आरेमध्ये कारशेडचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर एमएमआरसीने मेट्रोेचे डबे आणण्याच्या नावाखाली आरेतील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात वृक्षतोड केली, असा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर आरेचा वाद आणखी चिघळला असून रविवारचे आंदोलनही व्यापक होत चालले आहे. आंदोलनाला सर्वसामान्यांचाही पाठींबा मिळू लागला आहे.

हे ही वाचा :- 

महाराष्ट्राचे दोन “अनमोल रत्न” – अमृता फडणवीस

Exit mobile version