Wednesday, July 3, 2024

Latest Posts

Maharashtra Assembly Monsoon Session 2024: पी एम किसान योजना, नमो किसान योजनेतून ७० लाख शेतकऱ्यांना १२ हजार रुपयांची मदत: Dhananjay Munde

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनास (Maharashtra Assembly Monsoon Session 2024) काल (मंगळवार, २ जुन) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी लक्षवेधी दरम्यान पी एम किसान योजनेतून (PM Kisan Yojana) ६ हजार आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेतून (Namo Shetkari Mahasanman Yojan) ६ हजार असे एकूण १२ हजार रुपयांची मदत एकूण ७० लाख लाभार्थी शेतकऱ्यांना दिली गेली असल्याचे सांगितले. तसेच गेल्या एका वर्षात २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवारू याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, “केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत ७० लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते. कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती आज एका लक्षवेधीच्या उत्तराच्या निमित्त विधानसभेत दिली.”

ते पुढे म्हणाले, “पी एम किसान योजनेत राज्यातील ६५ हजार शेतकरी काही कागदपत्रांच्या किंवा ई केवायसीच्या कारणावरून वंचित राहिल्या संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांसह विविध सदस्यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. संबंधित ६५ हजार शेतकऱ्यांचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर केलेला असून या प्रस्तावास शक्य तितक्या लवकर मान्यता मिळवून देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.”

“या योजनेमध्ये आणखी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची वाढ व्हावी याबाबत राज्यस्तरावरून तसेच केंद्र स्तरावरून विविध मोहिमा वेळोवेळी राबविण्यात येतील, तसेच डेटा एन्ट्री करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात येतील,” असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Mukhyamantri Majhi Ladki Bahin योजनेच्या ‘या’ अटी तुम्हाला माहिती आहेत का?

राज्यातील ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश, Deepak Kesarkar यांनी दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss