spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ढकलले पुढे

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा 18 जुलै रोजी होणार होते.

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा 18 जुलै रोजी होणार होते परंतु विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे पावसाळी अधिवेशन आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संसदीय कार्याविभागाने कळवल्यानंतर या संदर्भात महाराष्ट्र विधिमंडळाने अधिकृत पत्र काढून माहिती दिली.

 विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख 2022 च्या प्रथम सत्रात शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली होती त्यानुसार 18 जुलै 2022 या दिवशी पावसाळी अधिवेशन सुरू होईल असे सांगण्यात आले होते पण संसदीय कार्या विभाग सूचनेनुसार हे अधिवेशन आता पुढे ढकलण्यात आले आहे परंतु पावसाळी अधिवेशनाची पुढची तारीख संसदीय कार्या विभागाने जाहीर केलेली नाही. पण लवकरच या संदर्भातील नवीन तारीख जाहीर करण्यात येईल असे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा : 

नरेश म्हस्के यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती

Latest Posts

Don't Miss