“Maharashtra Band हा बंद विकृती विरोधी संस्कृती असा आहे”; Uddhav Thackeray यांचे मंतव्य

“Maharashtra Band हा बंद विकृती विरोधी संस्कृती असा आहे”; Uddhav Thackeray यांचे मंतव्य

Uddhav Thackeray on Maharashtra Band : सध्या १३ ऑगस्ट रोजी घडलेली बदलापूर येथे स्थित असलेली आदर्श विद्यामंदिर या शाळेत एका ४ वर्षीय मुलीवर नराधमाने अत्याचार केले या प्रकरणाचे लोण राज्यात सर्वत्र पसरले आहे. अनेक ठिकाणांहून आक्रोश, संताप व्यक्त होत आहे. लोक या घटनेने क्रुद्ध झाले आहेत. या प्रकरणी २० ऑगस्ट रोजी तब्बल १० ते १२ तास आंदोलन झाले. शेवटी संध्याकाळी सौम्य लाठीचार्ज करत आंदोलकांना बदलापूर स्थानकातून तसेच आजूबाजूच्या परिस्थितीतून पांगवण्यात आले होते. या घटनेच्या निषेर्धात महाविकास आघडीने येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यावर काल (२२ ऑगस्ट) उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज (२३ ऑगस्ट) महाराष्ट्र बंद संदर्भात पत्रकार परिषद घेतली. या संदर्भात सविस्तर त्यांनी सांगितले आहे ते आपण जाणून घेऊ.

राजकीय कारणासाठी उद्याचा बंद (Maharashtra Bandh)  नाही. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी हा बंद आहे. आम्ही विकृतीचे विरोधक आहोत. कोणत्याही  राजकीय पक्षांचा नाही तर सर्व नागरिकांच्यावतीने उद्याचा बंद आम्ही करत आहे. सर्व भेद विसरून उद्या बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)  केले आहे. सरकारला काहीही म्हणून देत मी जनतेच्या बाजूने आहे. जनतेला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. यंत्रणा वेळेत हलली असती तर हा उद्रेक झाला नसता.  आता हायकोर्टाने काल थोबडवलं तेही राजकारणाने प्रेरित होतं का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

“घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बहिणींची किंमत फक्त मतापुरती आहे. आम्ही नाती जपतो, आम्हाला नाती महत्त्वाची आहेत. उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ हा तुमच्या कुटुंबियांसाठी देखील आहे, म्हणून ह्या बंदमध्ये सहभागी व्हा! उद्याचा बंद हा  महाराष्ट्राच्या जनेतसाठी आहे.  हा बंद विकृती विरोधी संस्कृती आहे.  बऱ्याच पालकांना आपले मुलं शाळेत सुरक्षित आहे का? याची भीती वाटत आहे. याला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे.  उद्याचा बंद महाविकास आघाडीतर्फेच नाही तर सर्व जनतेचा बंद आहे. सर्वांना या बंदात सहभागी व्हा, तसेच  उद्याचा बंद कडकडीत पाळावा असे मी आवाहन करतो. या बंदच्या काळात ज्या अत्यावश्यक सेवा आहे त्या चालू राहतील. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळावा. दुकानदारांनाही उद्या  बंद पाळावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.”

“उंबरठ्यापर्यंत आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही एक आहोत, ह्याचं विराट दर्शन दाखवून द्या! हिंसा होऊ नये अशी माझी इच्छा आहे, पोलीस महासंचालिका यांनी लाडकी बहीण व्हावे, मध्ये येऊ नये असे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकल आणि बस सेवा ही बंद ठेवायला हवी, पोलिसांनी दादागिरी करू नका. सरकार अकार्यक्षम असलं तरी जनतेला सक्षम व्हावे लागते. उद्याच्या बंदचा फज्जा उडवू नका, नाही तर जनता दोन महिन्यांनी तुमचा फज्जा उडवेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. “

“मी सरकारला आणि सरकारी पक्षाला विनंती करतोय, कुठेही अतातायीपणे सरकारने वागू नये. सर्व आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेतलेच पाहिजे. अन्यथा त्यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागेल. पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका, नाहीतर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही, पण सुरक्षित बहीण महत्त्वाची आहे. आता संतापचा कडेलोट होत आहे. आजही अटक सुरू आहे, या आंदोलकांना दरोडेखोरांना आणतात तसे आणले जात आहे. हे अतिशय चुकीचं आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

एकंदरीतच आजच्या संपूर्ण पत्रकारांच्या संवादात उद्धव ठाकरे यांनी उद्याची परिस्थिती कशी असेल आणि त्यासाठी काय खत्तरदारी घेणे आवश्यक आहे या संदर्भात त्यांनी यात सविस्तर मांडणी केली आहे.

हे ही वाचा:

शनिवारी राहणार महाराष्ट्र बंद; ‘या’ सेवा राहणार बंद आणि ‘या’ सुविधा राहणार चालू जाणूयात काय आहेत त्या..

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मी मैदानात उतरणार.. ; Sharad Pawar यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version