spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शनिवारी राहणार महाराष्ट्र बंद; ‘या’ सेवा राहणार बंद आणि ‘या’ सुविधा राहणार चालू जाणूयात काय आहेत त्या..

सध्या १३ ऑगस्ट रोजी घडलेली बदलापूर येथे स्थित असलेली आदर्श विद्यामंदिर या शाळेत एका ४ वर्षीय मुलीवर नराधमाने अत्याचार केले या प्रकरणाचे लोण राज्यात सर्वत्र पसरले आहे. अनेक ठिकाणांहून आक्रोश, संताप व्यक्त होत आहे. लोक या घटनेने क्रुद्ध झाले आहेत. या प्रकरणी २० ऑगस्ट रोजी तब्बल १० ते १२ तास आंदोलन झाले. शेवटी संध्याकाळी सौम्य लाठीचार्ज करत आंदोलकांना बदलापूर स्थानकातून तसेच आजूबाजूच्या परिस्थितीतून पांगवण्यात आले होते. या घटनेच्या निषेर्धात महाविकास आघडीने येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या प्रकरणानंतर अचानक जाग आलेल्या राज्य सरकारने विद्यार्थिनींची सुरक्षा विचारात घेत शाळांमध्ये तातडीने ‘सखी सावित्री समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्याच्या या महाराष्ट्र बंदमुळे काही सुविधांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्या सुविधा कोणत्या त्या स्नदर्भात जाणून घेऊ..

या बंदमध्ये महाविकास आघाडीने जनतेला सामील होण्याचे आवाहन केले आहे. तसेच या बंदमुळे जनजीवन देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी संवेदनशील मन असलेल्यांनी “२४ ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा” असं आवाहन केले आहे. दुपारी २ वाजेपर्यंत बंद पाळण्याचं त्यांनी आवाहन केले आहे.  त्यामुळे आता २४ ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदला कसा प्रतिसाद मिळणार? हे पाहत असताना नागरिकांच्या मनात नेमकं या दिवशी काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार? हा प्रश्न पडला आहे. दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज, बॅंका बंद राहणार का? हे इथे जाणून घेणार आहोत.

 काय बंद राहणार? 

अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच भाजीपाला मार्केट, दूध विक्री, भाजीपाला विक्री, किराणा सामानाची दुकानं, हॉटेल्स व इतर दुकान बंद राहण्याची शक्यता आहे.

  • शाळा – कॉलेज :
    महाराष्ट्र बंद मध्ये शाळा, कॉलेज बंद ठेवण्याबाबत निर्णय झालेला नाही. सरकार कडून अद्याप त्याबद्दल नोटिफिकेशन जारी केलेलं नाही त्यामुळे शाळा-कॉलेजचा निर्णय अद्याप न झाल्याने त्या नियमित सुरू असतील. ज्या शाळा, कॉलेजला शनिवारी सुट्टी असते त्या आपोआपच बंद असणार आहेत.
  • बॅंका :
    24 ऑगस्ट हा चौथा शनिवार असल्याने बॅंका बंद राहणार आहेत. आरबीआय च्या नियमानुसार, बॅंका दुसरा आणि चौथा शनिवार तसेच प्रत्येक रविवारी बंद असतात.

कोणत्या सेवा सुरु राहणार ? 

  • आरोग्य सेवा :
    राज्यात महाविकास आघाडीने उद्या बंद पुकारला असला तरी राज्यातील आरोग्य सेवा जसे की, क्लिनिक्स, रुग्णालये आणि मेडिकल्स नियमितपणे सुरू राहतील.
  • बस, रेल्वे, मेट्रो वाहतूक सेवा :
    या महाराष्ट्र बंदला राज्य सरकारचा पाठिंबा नाही. त्यामुळे राज्यातील एसटी, रेल्वे आणि सीटी बस सेवा सुरू राहणार आहे. २४ ऑगस्टची महाराष्ट्र बंद ची हाक ही विरोधकांकडून देण्यात आली आहे. सरकारचा महाराष्ट्र बंद ला पाठिंबा नसल्याने नियमित वाहतूक सेवा सुरू राहणार आहे.

हे ही वाचा:

Exclusive : “महाराष्ट्र बंद राजकीय नाही..” – Uddhav thackeray

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मी मैदानात उतरणार.. ; Sharad Pawar यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss