Wednesday, July 3, 2024

Latest Posts

Maharashtra Budget 2024: गाजर,गजर आणि बांबू…

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे एकत्रितपणे पत्रकार परिषदेला सामोरे गेले अर्थसंकल्पाचे वर्णन करताना ‘वादा निभाने वाला हमारे दादा का अर्थसंकल्प है’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले त्याचवेळी विधिमंडळाच्या आवारात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अर्थसंकल्पावर टीका करीत होते. अर्थसंकल्पातून गाजर दाखवण्याचा प्रयत्न असे वर्णन उद्धव ठाकरे यांनी केले होते.

त्याचा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले अर्थसंकल्पातले आम्हाला काही कळत नाही असे जे बोलत होते तेच आज अर्थसंकल्पावर बोलू लागले आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प गाजर असेल पण आमच्या दृष्टीने मात्र… मुख्यमंत्र्यांचे हे वाक्य पूर्ण होण्याच्या आत एका पत्रकाराने तुमचा बांबू अर्थसंकल्प अशी टीका केली. कारण विधिमंडळाच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर होत असताना बांबू लागवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये परस्परांवर टीकाटिप्पणी झाली होती. त्यामुळे पत्रकार परिषदेत बांबू असा उल्लेख होताच पत्रकार हास्यकल्लोळात बुडाले. मुख्यमंत्री ही त्यामध्ये मनापासून सहभागी झाले. थोडा वेळ थांबत मुख्यमंत्री म्हणाले, पण आमच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या विकासाचा गजर अर्थसंकल्प आहे. हे वाक्य पूर्ण होताच मुख्यमंत्र्यांनी हसत हसतच बांबूच्या मुद्द्याला हात घातला. बांबू हा 20% ज्यादा ऑक्सिजन सोडतो आणि कार्बन डाय-ऑक्साइड जादा शोषतो. केवळ एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्र्यांनी बांबूचा धागा पकडत उबाठा नेते संजय राऊत यांच्यावर घसरले. आजकाल पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंग काय काय अशा विषयावर सकाळी लवकर सुरू होते. हे वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण हे कुठेतरी आपल्याला ‘बांबू’ लावून कमी करायचे आहे.

या बांबू पुराणात अजित पवारही आवडीने सहभागी झाले आणि ‘बांबू लावल्यावर’ काय काय होते ते मुख्यमंत्री तुम्हाला सांगत आहेत अजित पवार यांच्या या कोटीवर संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्याचा एकच फवारा उडला. मुख्यमंत्र्यांना बांबूचा विषय भलताच आवडलेला होता. त्यामुळे पुन्हा बांबू पुराण सुरू करत मुख्यमंत्री म्हणाले प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही दहा लाख हेक्टर मध्ये बांबूची लागवड करीत आहोत. तुम्ही ‘बांबू लावण्याचा’अर्थ वेगळा का घेता अशाप्रकारे आजच्या या पत्रकार परिषदेत गाजर गजर आणि बांबूच्या विषय भलताच गाजला.

हे ही वाचा:

Maharashtra Budget Session 2024: राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प, Nana Patole यांची टीका

Maharashtra Budget Session 2024: आजचे बजेट म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’, Jayant Patil यांची मिश्किल टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss