Friday, June 28, 2024

Latest Posts

Maharashtra Budget 2024-25: अर्थमंत्री Ajit Pawar यांनी केले सादर, राज्यात ‘या’ नव्या योजना करणार लागू

महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झाले असून आज (शुक्रवार, २८ जून) महाराष्ट्र अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावेळी त्यांनी राज्यात नवीन योजन चालू करणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात चालू केली गेली आहे.

  • मुख्यमंत्री लेक लाडकी योजना.
  • वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार.
  • शेतकऱ्यांसाठीच्या योजनेवर विशेष भर.
  • मुख्यमंत्री माझी बहिण योजना राबवण्यात येणार.
  • ८ लाख रुपये असणाऱ्या कुटुंबियांसाठी योजना आखली जाणार.
  • शासन नवे दुग्धव्यवसाय सुरु करणार.
  • गाव तिथे गोदाम योजना राबण्यात येणार.
  • अटल बाबू १० हजार लागवड बांबूची लागवड केली जाणार.
  • शेतकऱ्यांना सौरऊर्जा मिळणार.
  • विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेचा निधी वाढवला
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा
  • इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ
  • कापूस, सोयाबीन, शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५ हजार रुपयांचं सहाय्य
  • गाय दूध उत्पादकांना जुलैपासून ५ रुपयांचं अनुदान सुरू राहाणार
  • शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणार
  • मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर
  • नवी शासकीय महाविद्यालये स्थापन होणार
  • मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार
  • प्रतिदिंडी २० हजार रुपयांचा निधी
  • राज्यात १० हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देणार

  • नवीन रुग्नवाहिका खरेदी करणार

  • वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलिंडर मोफत देणार.

  • बच्चत गटाच्या निधीत १५ हजारांहून ३० हजार रुपयांची वाढ केली जाईल

  • यावर्षी २५ लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार

  • व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार

  • कांद्या तेल बियाणे याकरता फिरता निधी देण्यात येईल

  • मत्स्य बाजार स्थापना केले जाणार

  • वन्यप्राणी हल्ल्यात २० लाख रुपये दिले जायचे. आता २५ लाख रुपये मिळणार

  • पशुधन हानी नुकसान भरपाईत वाढ

  • अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण केले जाणार

  • ⁠महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प हाती घेतला जाणार

  • सांगली येथे सौर उर्जा प्रकल्प राबवला जाणार

  • गोसेखुर्द प्रकल्पातून ६५ टीएमसी पाणी वळवले जाणार

  • जल युक्त शिवार अभियान २ राबवले जाणार

बातमी अपडेट होत आहे.

Latest Posts

Don't Miss