Friday, June 28, 2024

Latest Posts

Maharashtra Budget Session 2024: अर्थमंत्री Ajit Pawar करणार राज्याचा अर्थसंकल्प सादर, काय असतील नव्या योजना?

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला 27 जून पासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 जून रोजी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Budget) मांडणार आहेत. विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून त्या अनुषंगाने आता अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अर्थसंकल्पात सर्व घटकांना सामावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. या अर्थसंकल्पात सरकार कोणत्या घोषणा करणार आहे, शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी काय योजना असणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिवेशन कालावधीत राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे. या आठवड्यात सलग दुसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. आज दुपारी दोन वाजता हा अर्थसंकल्प सादर होणार असून राज्यातील विद्यार्थी तरुण वर्गासाठी काय तरतुदी असतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सदर पावसाळी अधिवेशन शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक

राज्याचे पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढीसंदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक शनिवार २९ जून २०२४ रोजी विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील खाजगी तथा सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधीदूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी सांगितले. या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. या बैठकीचा अहवाल मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल, असे दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांनी सांगितले.

हे ही वाचा:

India Vs England: टीम इंडियाची बाजी, अंतिम सामन्यासाठी खेळाडू सज्ज

कुरकुरीत भेंडी करताना ‘या’ टिप्स वापरून पाहा, नक्कीच होईल फायदा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss