Friday, June 28, 2024

Latest Posts

MAHARASHTRA BUDGET SESSION 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे?

विधानसभा भवनातून महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे अर्थसंकल्प सादर करत आहेत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असे म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात करण्यात आई. २०२४ आणि २०२५ या वर्षांचा अतिरिक्त अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात येत आहे. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोर जाहीर केलं आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वय असलेल्या महिला अभागी होऊ शकतात.

(बातमी अपडेट होत आहे)

हे ही वाचा:

India Vs England: टीम इंडियाची बाजी, अंतिम सामन्यासाठी खेळाडू सज्ज

कुरकुरीत भेंडी करताना ‘या’ टिप्स वापरून पाहा, नक्कीच होईल फायदा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss