महाराष्ट्रात सरकारने केला जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीचा परवाना रद्द

२०२३ पासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जगभरातील टॅल्क बेस्ड बेबी पावडरची विक्री पूर्णपणे बंद करणार आहे.

महाराष्ट्रात सरकारने केला जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीचा परवाना रद्द

johnson and johnson

तान्ह्या मुलांसाठी वापरली जाणारी बेबी पावडर म्हणजे जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन. हे नाव बेबी प्रॉडक्ट्सशी गेली कित्येक वर्ष जोडलं गेलं आहे. पण, सध्या याच पावडरीसंबंधी समोर येणारी एक महत्तवाची बातमी म्हणजे लहान मुलांसाठी देशभरात वापरल्या जाणाऱ्या जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीच्या पावडरवर बंदी घालण्यात आली आहे. पावडरमध्ये दोष आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कंपनीचा थेट परवानाच रद्द करण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने घेतला आहे.

जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीच्या पावडरला देशभरात प्रचंड मागणी आहे. घराघरात प्रत्येक लहान मुलासाठी ही पावडर वापरली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पावडरमध्ये दोष असल्याच्या विविध चर्चा सुरु होत्या. अमेरिकेतही या पावडरवर बंदी आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या पावडरची चाचणी भारतात केली गेली. कोलकाताच्या प्रयोगशाळेत चाचणी केली गेली. त्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये दोष आढळले आहेत. त्यामुळे राज्याच्या अन्न आणि ओषध प्रशासनाने कंपनीचा थेट परवाना रद्द केला आहे.

२०२३ पासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जगभरातील टॅल्क बेस्ड बेबी पावडरची विक्री पूर्णपणे बंद करणार आहे. या कंपनीच्या वतीनेच ही माहिती देण्यात आली. अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या हजारो कन्झ्युमर सेफ्टी केसेसमुळे या प्रॉडक्ट्सची विक्री बंद करणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. गेली कित्येक वर्षे बेबी पावडर संपूर्ण जगभरात विकली जात आहे; पण आता मात्र जगभरातील पोर्टफोलिओ काढून टाकण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

PM Narendra Modi Birthday 2022: पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या ‘ या ‘ पाच निर्णयांमुळे देशात घडले मोठे बदल.

The journey of PM Modi : मोदींचा चहावाला ते पंतप्रधान पर्यंतचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version