एकनाथ शिंदे नॉट रीचेबल

मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत सर्व आमदारांना मुंबईत तात्काळ येण्याचे आदेश जारी केलेत. तेव्हाच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. 

एकनाथ शिंदे नॉट रीचेबल
राज्यसभा आणि आता विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्याने सत्ताधारी आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची जास्त मते फुटल्याने पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलवली असून काहींना बाहेरचा रस्ता दाखविण्याची शक्यता आहे. त्यातच शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांच्या एका गटासह नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांच्या एका गटासह नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. मध्यरात्रीच वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक पार पडली. काही आमदारांची आणि नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. शिवसेना आमदारांची तातडीची बैठक आज मुंबईत होत आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं कमी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत सर्व आमदारांना मुंबईत तात्काळ येण्याचे आदेश जारी केलेत. तेव्हाच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत.
एकनाथ शिंदे हे गुजरातमधील सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरत चालली आहे. शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण 12 मतं फुटल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे संतापलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत वर्षा निवासस्थानी दुपारी 12 वाजता बैठकीसाठी बोलावलं आहे. या सगळ्याची सखोल चौकशी ठाकरे सरकार करणार आहे. सत्तेतले गद्दार कोण, कोणत्या गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार याची आता उत्सुकता आहे.
Exit mobile version