Wednesday, July 3, 2024

Latest Posts

Maharashtra Monsoon Assembly 2024: ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार, Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा करत राज्य सरकारच्या (Maharashtra Government) वतीने गट कच्च्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया (Group C Recruitement) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) राबवण्यात येणार आहे अशी माहिती दिली.

महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन २०२४ (Maharashtra Monsoon Assembly 2024) चा चौथा दिवस असून विधिमंडळाच्या परिसरात विरोधकांनी पेपरफुटीवरून (Paper Leak Case) आज (सोमवार, १ जुलै) आंदोलन केले सभागृहातही यावरून प्रश उपस्थित करण्यात आले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा करत राज्य सरकारच्या (Maharashtra Government) वतीने गट कच्च्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया (Group C Recruitement) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) राबवण्यात येणार आहे अशी माहिती दिली. “लोकांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील याबाबत तयारी दर्शवली आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, “नोकरभरती परीक्षेंमधील गैरप्रकाराचं विषय गंभीर आहे. पण घडलं काय आणि नरेटीव्ह काय आहे? मागच्या सरकारच्या काळात किती आणि काय फुटलं याची जंत्री मी आणली आहे. मात्र त्यामध्ये मी जाणार नाही. पेपर फुटीच्या प्रकरणात आपण कारवाई केलेली आहे. केवळ एक गुन्हा दाखल झाला असून दुसरा कुठलाही गुन्हा आतापर्यंत दाखल झालेला नाही. आतापर्यंत ७५ हजारची रिक्त भरती घोषित केली होती. त्यापैकी सरकार आल्यांनतर ५७ हजार ४५२ जणांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आता परीक्षा ह्या टीसीएसच्या केंद्रावर आणि आयबीपीएसतर्फे होतील,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आमच्या सरकारने ७७ हजार ३०५ लोकांना नोकरी दिली आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही. ७७ हजार पदे भरणे हा राज्य सरकारचा रेकॉर्ड आहे. यात सर्व विभाग आहेत. गट की च्या जागा टप्याटप्याने भरणार आहोत.”

“सर्व विभागाची यादी माझ्याकडे आहे. टीसीएस आणि आयबीपीएस या दोन्ही संस्थांनी परीक्षा घेतल्या हायेत. पेपरफुटीबाबत जो एफआयआर झाला त्याबाबत मी बोललो आहे. कुठलीही गोष्ट लपवण्याची कारण नाही. सरकारने पारदर्शी प्राके काम केले आहे. एखाद्या ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न झाला तो आम्ही हाणून पाडला आहे. पेपर फुटीबाबत केंद्र सरकारने जो कायदा केला आहे त्यावर राज्य सरकारनेदेखील कायदा करण्याचा मागण्या अधिवेशनात केला आहे. या अधिवेशनात पेपरफुटीविरोधात कायदा करणार आहोत,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

Mumbai Graduate Constituency : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा आरोप, वर्ल्ड कपच्या नावाखाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss