spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Monsoon Update: राज्यात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात रेड अलर्ट

मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्र : राज्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे नदी – नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटबही घडल्या आहेत. काही घरांवर दरड कोसळली आहेत. काल वसई येथील एका घरावर दरड कोसळली. आजही मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे रस्त्यावर सखल भागात पाणी साचले आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. चिपळूण मधील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे अखेर नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी नद्या ओसंडून वाहत आहेत.

 

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अधूनमधून 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहून 60 किमी प्रतितास वेगाने येण्याची शक्यता असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने सूचित केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजही पाऊस सुरुच राहणार आहे. बुधवारी मुसळधार पावसामुळे नाशिकमधील अनेक भागात पाणी साचलं होतं. दरम्यान आज नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

हेही वाचा :

आर्यन खानला मोठा दिलासा, पासपोर्ट परत देण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश

 

राज्यातील पूरस्थिती
मुंबईमध्ये धो- धो पाऊस कायम आहे. सगळी धरणे ओव्हरफ्लो झालेली आहेत पुणे, कोल्हापूर, पालघर, साताऱ्यामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर औरंगाबादसह मराठवाड्यात पावसाचा जोर आणखी – वाढला – नांदेड जिल्ह्यातील पंधरापैकी सोळा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे.

Latest Posts

Don't Miss