महाराष्ट्र पुन्हा अलर्टवर! मुंबई – पुण्यात घातपाताची शक्यता

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार काश्मीर मधून २ आणि उत्तरप्रदेशातून १ अशा एकूण तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली

महाराष्ट्र पुन्हा अलर्टवर! मुंबई – पुण्यात घातपाताची शक्यता

गेल्या आठवड्यात रायगडच्या समुद्रकिनारी संशयास्पद बोट आढळून आली होती आणि संपूर्ण राज्यात अर्लट जारी करण्यात आला होता.त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रावर घातपाताचे संकट घोंगावत आहे. रायगडच्या बोटीचा तपास पूर्ण होतो ना होतोय तोच महाराष्ट्रात पुन्हा अलर्ट जारी करावा लागणार का असा प्रश्न विचारला जातो आहे. कारण पुण्यातून अटक करण्यात आलेला दहशतवादी जुनैदने घातपात आणि हिंदुत्ववादी व्यक्तींची हत्या करण्याची तयारी केल्याची माहिती चौकशीदरम्यान दिलीये.

बुलढाण्यात पुणे इटीएस (ETS) ने दहशतवादी कट रचणाऱ्या जुनैद आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. तर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर बुलढाण्यातून अटक करण्यात आलेल्या या दहशतवादी कट रचणाऱ्या जुनैदने एक धक्कादायक माहिती दिली आहे. जुनैदने दिलेल्या माहितीनुसार, तो आणि त्याचे साथीदार बुलढाण्यात लपून उत्तरप्रदेशातील काही धार्मिक नेत्यांच्या हत्येचा कात रचत होते. या नेत्यांमध्ये उत्तरप्रदेशातील नरसिंह नंदन, जितेंद्र नारायण म्हणजेच आधीचे वसीम रिझवी आणि गायक संदीप आचार्य यांचा समावेश होता.

अभिनेते अमिताभ बच्चन दुसऱ्यांना ठरले कोरोना पॉसिटीव्ह

२४ वर्षाचा जुनैद बुलढण्यातील खामगावमधून नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आला. पुण्यातील भूपर्डी भागात तो राहू लागला. पुण्यात लहान – मोठी मिळतील ती कामं करून तो राहू लागला. याचदरम्यान तो पाकिस्तान आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होता. मे महिन्यात पुणे इटीएसने त्याला अटक केली. जुनैदने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार काश्मीर मधून २ आणि उत्तरप्रदेशातून १ अशा एकूण तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता देशात हिंसक कारवाई करण्याचा त्यांचा मानस होता अशी माहिती आता समोर येतेय. त्याचबरोबर आता जुनैद महाराष्ट्रातील संपर्कात असणाऱ्या इतर युवकांचा देखील शोध सुरु आहे.

इतकेच नव्हे तर हल्लीच मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सना आणि पुण्यातील फाइव्ह स्टार हॉटेलांना जिथे महाराष्ट्रातील किंवा राज्यातील नेते कधीतरी आश्रयासाठी असतात, अशा हॉटेल्सना काही दिवसांपासून धमकीचे मेल येत आहेत. जुनैदने दिलेली माहिती , पंचतारांकित हॉटेल्सना मिळालेले धमकीचे मेल आणि जवळपास दोन वर्षांनी मोकळेपणाने गणेशोत्सव साजरा करता येणार म्हणून सुरु असणारी लोकांची लगबग. या सर्व गोष्टींमुळे आणि महाराष्ट्रावर येऊन ठाकलेल्या या घातपाताच्या संकटामुळे आता मुंबई आणि पुण्यातील सुरक्षा चांगलीच वाढवली गेली आहे.

हे ही वाचा:

स्वाइन फ्लू: अचानक फ्लूच्या घटनांमागील कारणे काय आहेत आणि ते कसे टाळता येईल

‘पियूची वही’ कादंबरीला मिळाला साहित्य अकादमीचा पुरस्कार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version