MAHARASHTRA: कांद्याचा दर अर्ध्यावर, महाराष्ट्रभरात शेतकरी आक्रमक

MAHARASHTRA: कांद्याचा दर अर्ध्यावर, महाराष्ट्रभरात शेतकरी आक्रमक

कांद्याच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रभरात शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांद्याच्या निर्यातबंदीवरुन (Onion Export Ban) सध्या राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. लासलगाव बाजार समितात सध्या कांद्याला सरासरी २१०० रुपयांचा दर मिळत आहे. तर कमीत कमी ८०० तर जास्तीत जास्त २३०४ रुपयांचा भाव मिळत आहे. पियुष गोयल यांची भेट कांदा निर्यातदार घेणार आहेत. कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. कांदा निर्यात बंदी नंतर कांद्याच्या भावात घसरण होणार आहे. कांद्याचा दर अर्ध्यावर आल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०० कोटींचा फटका बसला आहे आणि त्यामुळे व्यापारी आणि बाजार समितीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्यावर ७ डिसेंबरला निर्यात लावण्यात आल्यानंतर लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समिती मधील कांद्याचे भाव कमी झाले आहेत.

कांद्याने सरासरी तीन ते चार हजार रुपयांचा पल्ला गाठायला सुरुवात केली असताना भाव कोसळून थेट पंधराशे रुपयांवर आला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लासलगाव बाजार समिती व विंचूर निफाड या बाजार समितीमध्ये कांद्याची दैनंदिन आवक ४०००० क्विंटल इतकी असते. तर नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या मिळून सुमारे दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होते.

मागील सात दिवसांमध्ये ४० कोटींचे तर संपूर्ण जिल्ह्यातील कांद्याच्या आवकाचा विचार केला असता दहा लाख रुपये क्विंटल मागे १५०  ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे यामागे व्यापारी वर्गाला देखील निर्यात बंदीचा फटका बसला असून परिणामी जिल्ह्यातील बाजार समितीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे भाव सतत कोसळत असल्याने मनमाड येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याच्या दरात सुरू असलेली घसरण वाढताना दिसून येत आहेत. तर एनसीसीएफ (National Cooperative Consumers​ Federation) करून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

 “संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट

दरवर्षी का होतो कांद्याचा वांदा? निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना किती बसतो फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version