spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Rain, आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता…

सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे, तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे, तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. या पावसानं काही प्रमाणात शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, मागील तीन चार दिवसापासून सुरु झालेल्या पावसानं पिकांना जीवदान दिलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळाला आहे. पाण्याअभावी पीकं माना टाकू लागली होती. अशा पिकांना आता जीवदान मिळणार आहे. दरम्यान, राज्यातील मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. त्याचबरोबर वाशिम, नंदुरबार, पुणे, नाशिक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली.

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. गेल्या महिन्याभरापासून पाठ फिरवलेल्या पावसाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा आगमन झाले आहे. त्यामुळे कडकडीत उन्हाने शेतातील पिकं करपू लागल्याने चिंताग्रस्त बनलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत २५३१ मिमीच्या सरासरीने पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक (Nashik) जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. सटाणा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून हरणबारी धरणातून मोसम नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सटाणा तालुक्यातील मुल्हेर ते शेवरा या गावांना जोडणारा पुल हा या पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं गेल्या तीन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. संपूर्ण जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे. दमदार पावसामुळं सातपुड्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. जोरदार पावसामुळे पिकांना काही अंशी जीवदान मिळाल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील धरणातील पाण्याच्या पातळीत अजूनही वाढ झाली नसल्याने जिल्ह्यात दमदार अशा पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

हे ही वाचा: 

Asia Cup 2023 Ind vs Pak, आज होणार भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला, पहा दोन्ही संघाचे प्लेइंग ११

WhatsApp New Feature, व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेला मेसेज आता सहज एडिट करता येणार…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss