Maharashtra Rain Update : राज्यात सर्वदूर पाऊस, मुंबई- उपनगरात नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

Maharashtra Rain Update : राज्यात सर्वदूर पाऊस, मुंबई- उपनगरात नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत काही काळ पाऊस तळ ठोकण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात मुंबईत मुसळधार पाऊस पडणार नसून पावसाच्या हलक्या सरी बरसतील. हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार १० ऑक्टोबरनंतरच मान्सून निघून जाईल आणि पावसाळा थांबेल.

राज्यात यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

हेही वाचा : 

Gulabarao Patil : आदित्यलाही मुलं होतील, मग? : मंत्री गुलाबराव पाटील

पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईत किमान तापमान २७ अंश सेल्सियस तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सियस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सुरुवातीला जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात तुफान पाऊस झाला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सरासरीपेक्षा २३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याचे पाहायला मिळालं. यामुळं शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Women’s Asia Cup INDW vs PAKW Live : पाकिस्तानने भारतापुढे ठेवले १३८ धावांचे आव्हान

Exit mobile version