spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MAHARASHTRA: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच, पुन्हा चार जणांचा मृत्यू

सध्या राज्यात अपघाताचे सत्र सुरू असताना पाहायला मिळत आहे. नाशिक (NASHIK) मध्ये रविवारी संध्याकाळी (SUNDAY EVENING) झालेल्या भीषण अपघातात (ACCIDENT) पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जळगाव (JALGAON) जिल्ह्यातील चाळीसगाव (CHALISGAON) मधील कन्नड घाटात (KANNAD GHAT ACCIDENT) अपघात झाला. रात्रीचा अंधार आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तसेच अपघातात सहाजण जखमी झाले आहेत.  दोन्ही अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घाटात झालेला हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-Mortem) रुग्णालयात पाठवले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील (JALGAON DISTRICT) चाळीसगावच्या (CHALISGAON) कन्नड घाटात (KANNAD GHAT) रविवारी रात्री अपघात झाला. रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात झाला. धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे  नियंत्रण सुटले आणि टवेरा गाडी (TAVERA CAR) दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, सात जण गंभीररित्या जखमी झाले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रविवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील (NASHIK DISTRICT) मनमाड (MANMAD) जवळ अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर कार (CAR) आणि कंटेनर मध्ये भीषण अपघात झाला या अपघातात रोहित धनवटे (ROHIT DHANVATE), ललित सोनवणे (LALIT SONVANE), श्रेयस धनवटे (SHREYAS DHANVATE), गणेश सोनवणे (GANESH SONVANE), प्रतीक (PRATIK) हे ठार झाले. सर्वजण मनमाड (MANMAD) जवळच्या म्हसोबा देवस्थान येथील धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. त्यानंतर अक्कलकोट (AKKALKOT) येथून दर्शन घेऊन जाणाऱ्या टवेरा गाडी (TAVERA CAR) चा रविवारी रात्री दोन वाजता अपघात झाला. हे सर्वजण मालेगावकडे (MALEGAON) प्रवास करत होते. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

धुळयात ८८ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लुटून ,तरुणीचे अपहरण

TRENDING: शीख धर्मगुरू गुरुनानक यांची जयंती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss