spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MAHARASHTRA: IRCTC वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना मनस्ताप

सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान झालेला तांत्रिक बिघाड दुपारी साडेचार वाजता दुरुस्त करण्यात आला, असे आयआरसीटी (IRCTC) च्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नाताळ (CHRISTMAS) आणि नववर्षाच्या (NEW YEAR) निमित्ताने रेल्वे टिकीट (RAILWAY TICKET) काढण्यासाठी प्रवाशांची घाई सुरू आहे. गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (INDIAN RAILWAY CATERING AND TOURISM CORPORATION) तिकीट संकेतस्थळावर (TICKET WEBSITE) तांत्रिक अडचणी (TECHNICAL ERROR) निर्माण झाल्याने तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे लाखो रेल्वे प्रवाशांना तिकीट काढणे शक्य झाले नाही. तांत्रिक समस्येमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.

आयआरसीटीसी (IRCTC) वरून तिकीट आरक्षित होणे, गुरुवारी साडेअकराच्या सुमारास बंद झाले. अनेक प्रवाशांनी वारंवार वेबसाईट सुरू करून बंद केली, त्यांनतर तिकीट आरक्षित करण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा, तिकीट आरक्षित झाले नाही. त्यामुळे प्रवाशांनी ट्वीटर (TWITTER) या समाज माध्यमावरून तक्रार करण्यास सुरुवात केली. काहींना तिकिटाची रक्कम भरता आली  नाही तर काही जणांच्या खात्यातून पैसे कापले गेले, मात्र तिकीट आरक्षणाचा तपशील दिसत नसल्याच्या तक्रारी ट्विटर (TWITTER) च्या माध्यमातून प्रवाशांनी मांडल्या.

प्रवाशांच्या वाढत्या तक्रारीमुळे आयआरसीटीसी (IRCTC) च्या ट्विटर माध्यमावरून दुपारी बारा वाजून चार मिनिटांनी संकेतस्थळाबाबत तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे मान्य करण्यात आले. तांत्रिक कारणांमुळे ई-तिकीट (E-TICKET)आरक्षण तात्पुरते बंद झाले होते. त्यामुळे तातडीच्या प्रवासाचे नियोजन असणाऱ्यांनी स्थानकातील तिकीट खिडकी (TICKET WINDOW) गाठून तिकीट काढले. तिकीट आरक्षण करून देणाऱ्या खाजगी कंत्राटदारांनाही तांत्रिक समस्या भेडसावत होत्या. सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान झालेला तांत्रिक बिघाड दुपारी साडेचार वाजता दुरुस्त करण्यात आला, असे आयआरसीटी (IRCTC) च्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हे ही वाचा:

सावनी रविंद्रचा ग्लॅमरस अंदाज,फोटो व्हायरल

POLITICS: पिक्चर अभी बाकी है..संजय राऊतांकडून कसिनोतील VIDEO ट्वीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss