Maharashtra Weather, नवीन वर्षात संकट येणार!, पावसाच्या आगमनाने होणार सुरुवात?

सध्या सगळीकडे ख्रिसमस या सणाची धुमधाम सुरु आहे. त्याच बरोबर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळे नागरिक आता सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे आता अवकाळी पावसाची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Weather, नवीन वर्षात संकट येणार!, पावसाच्या आगमनाने होणार सुरुवात?

सध्या सगळीकडे ख्रिसमस या सणाची धुमधाम सुरु आहे. त्याच बरोबर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळे नागरिक आता सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे आता अवकाळी पावसाची देखील शक्यता वर्तवली जात आहे. २०२३ वर्ष संपायला आता फक्त ३-४ दिवस उरले आहे. राज्यासह देशात तापमानात मोठी घसरण (Temperature Drops) झाली आहे. राज्यासह देशात गारठा वाढला आहे. वर्षाअखेरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार आहे. काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने उत्तर भारतात थंड वारे वेगाने वाहत आहे. परिणामी उत्तर भारतासह महाराष्ट्रातील तापमानातही घट झाली आहे. दरम्यान, राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची रिमझिम होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

नव्या वर्षात अवकाळी पावसाची शक्यता सध्या मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. दिनांक ३० डिसेंबर २०२३ ते दिनांक १ जानेवारी २०२४ या कालावधी दरम्यान तामिळनाडूतील किनारपट्टीवरील भागांत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कमी पातळीच्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग आणि दिल्ली आणि एनसीआरमध्ये पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

 

हवामाचा अभ्यास करणारी खासगी संस्था स्कायमेटकडून पावसाचा अंदाज आहे. ३० ते १ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पावसामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागताचा आनंदावर पावसाचे विरजन पडणार आहे. पश्चिम वाऱ्यांमुळे वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पाऊस पडणार आहे. अवकाळी पाऊस झाल्यास रब्बी पिकाला फटका बसणार आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे रब्बी पिकाची पेरणी कमी झाली आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्यात आलेला पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच यंदा थंडीही पडली नाही. त्याचा परिणाम रब्बी पिकावर होणार आहे. या सर्व संकटात अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे.

हे ही वाचा:

सनी लिओनी बनली गरजू मुलांसाठी सांता,गिफ्ट देत साजरा केला खास पद्धतीत ख्रिसमस

बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘डंकी’ ची निराशाच,कमाईत अपयशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version