spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra: कार्तिकी महापूजेचा मान कोणाला? आज निर्णय होण्याची शक्यता

कार्तिकी एकादशीच्या महापुजेचा मान कोणाला द्यायचा? यावरून काही दिवसांपासून वाद सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांना मराठा समाज आणि कोळी समाजाचा विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हा विरोध कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर कार्तिकी महापूजेच्या वादाचा पेच आज संपण्याची चिन्हे दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा करण्याचा निर्णय सुद्धा आज होईल, अशी शक्यता आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि मराठा आंदोलक यांच्यात आज एक बैठक होणार आहे, तसेच या बैठकीत चांगला निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आज होणाऱ्या बैठकीत मराठा आंदोलनाचा पेच सुटू शकेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांना वाटत आहे. मराठा समाजाबरोबर आदिवासी आणि कोळी समाजानेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूजेपासून रोखण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर जिल्हाधिकाऱ्यांनी कोळी समजाच्या नेत्यांशी चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोळी समाज आपल्या समजाची बैठक घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. २१ नोव्हेंबर अर्थात आज दुपारपर्यंत मराठा आणि कोळी समाजाच्या विरोधावर  यशस्वीपणे तोडगा निघेल आणि त्यांनतर २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळून विठूरायाची पूजा वारकऱ्यांसोबत केली जाईल, अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

कार्तिकी एकादशीच्या महापुजेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येऊ देणार नसल्याच्या भूमिकेतून मराठा आणि कोळी समाज आक्रमक झालेला असतांना, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस प्रशासन यांनी हा प्रश्न शांतपणे हाताळला. यामुळेच, आज आज दुपारपर्यंत मराठा आणि कोळी समाजाच्या विरोधावर  यशस्वीपणे तोडगा निघेल आणि बैठकीत योग्य तो मार्ग निघून हा वाद संपेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्र्यांना महापूजा करण्यास विरोध होत असतांना मराठा समजत फुट पडल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र, जिल्हाधिकारी यांनी रात्री उशिरा मराठा आणि कोळी समाजाच्या नेत्यांशी केलेल्या चर्चेतून मतभेद संपून एकसंघ समाज समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

Samruddhi Mahamarg दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

मुख्यमंत्री शिंदेनी म्हणाले, मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss