महिन्याच्या शेवटी महाराष्ट्राला बसणार अवकाळी पावसाचा फटका

पुन्हा एकदा एप्रिल महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये एप्रिलच्या शेवटला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महिन्याच्या शेवटी महाराष्ट्राला बसणार अवकाळी पावसाचा फटका

पुन्हा एकदा एप्रिल महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये एप्रिलच्या शेवटला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणामधील तापमान पुढील २-३ दिवस कोरडे राहणार आहे. दमट हवामान, अधिक आर्द्रता आणि तापमानामुळे कोकणात अधिक उष्ण आणि अस्वस्थ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये देखील परिणाम जाणवण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये तापमान जरी कमी असले तरी आर्द्रतेमुळे अधिक तापमानामध्ये वाढ होऊ शकते.

विदर्भामध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज कायम असणार आहे. विदर्भामध्ये २१ एप्रिल आणि २२ एप्रिल काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलढाणा जिल्यामधील संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव परिसरामध्ये २० एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह तुफान अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. जवळपास पावसाने तीन तास या परिसरामध्ये वादळी वाऱ्याने आणि पावसाने धुमाकूळ घातला होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळाने संग्रामपूर गावामधील जवळपास ६० ते ७० घरावरील छप्पर उडवून टाकले आहेत. घरावरील कौले सुद्धा उडवली होती. त्यामुळे या सर्व नागरिकांना रात्रभर उघडयावर रात्र काढावी लागली आहे.

काही घराची पत्रे एक ते दीड किलोमीटर पर्यंत उडून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. वादळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने नागपूर शहरामध्ये शेकडो झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे विजेच्या तारा तुटलेल्या नागपूरच्या अनेक भागांमध्ये बत्ती गुल झाली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघड्यावर ठेवलेले धान्य ओले झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे अमाप नुकसान झाले आहे. वारंवार येणाऱ्या अवकाळी पावसानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा गलथानपणा परत एकदा पुढे आला आहे.

हे ही वाचा : 

Breaking महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट; उष्माघाताने ५ जणांचा मृत्यू

आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं – उद्धव ठाकरे

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपयांचं धनादेश केला परत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version