महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांचा वाढदिवस असतो एकाच दिवशी

येत्या २२ जुलै रोजी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे.

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांचा वाढदिवस असतो एकाच दिवशी

येत्या २२ जुलै रोजी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. दोन्ही नेते राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. दोघांचाही प्रशासनावर मजबूत पकड आहे. दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात. दरम्यान, दोघांच्या शालेय आणि कॉलेज शिक्षणाबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. याची थोडक्यात माहिती घेऊया.

देवेंद्र फडणवीस यांचे शालेय शिक्षण नागपूर मध्ये शंकर नगर चौक येथील सरस्वती विद्यालयातून पूर्ण केले. नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी पाच वर्षासाठी लॉ पदवीसाठी प्रवेश घेतला. १९९२ मध्ये त्यांनी लॉ पदवी मिळवली. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पद्वुत्तर शिक्षण घेतले. तसेच त्यांनी जर्मनीमध्ये डीएसई बर्लिन या संस्थेत डिप्लोमा इन मेथड्स एंड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळवला. देवेंद्र फडणवीस हे १९९९ पासून ते आज सालापर्यंत विधिमंडळात आमदार आहेत. तसेच २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण अहमदनगर जिल्यातील राहुरी तालुक्यातील देवकाळी प्रवरा या त्यांच्या आजोळी झाले. यानंतरचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी अजित पवार यांना मुंबईत यावे लागले. मुंबईत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अजित पवार यांच्या वडिलांचे आकस्मित निधन झाल्यानंतर त्यांना शिक्षण सोडून पुन्हा बारामतीला यावे लागले. अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.

हे ही वाचा:

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार अर्थसाहाय्य ; मुख्यमंत्र्यांनी आणली ‘वयोश्री योजना’

Microsoft चा सर्व्हर बंद! कुठे वृत्तवाहिनी, कुठे कॉल सेंटर झाले ठप्प

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version