शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल- Girish Mahajan

शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल- Girish Mahajan

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana), मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशा अनेक कल्पक योजनांच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक संपन्नतेच्या महाराष्ट्राची पायाभरणी होत आहे. शासन या योजनांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व रोजगाराच्या क्षेत्रातील संपन्न राज्याकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले.

जनतेला संबोधित करतांना गिरीश महाजन म्हणाले की, जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. या परिस्थितीत प्रशासनाच्यावतीने व्यापक प्रमाणात पंचनामे सुरू केले आहेत. आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील. पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानाची मदत विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात येईल. सन 2023 मध्ये झालेल्या नुकसानापोटी एकट्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 446 कोटी रुपये वाटप यापूर्वी करण्यात आले आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेमध्ये (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) आतापर्यंत महाराष्ट्रात दीड कोटींवर महिलांना लाभ मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यात 8 लक्ष महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. युवक युवतींना 6 हजार ते 10 हजार रुपये महिन्याला विद्यावेतन मिळणार आहे. महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्यात येत आहे. मुलींना मोफत शिक्षण, एसटीमध्ये महिलांना प्रवासी तिकीटात 50 टक्के सवलत देण्यात येत असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Hezbollah Pager Blasts: पेजर म्हणजे नेमकं काय? पेजरला हॅक करता येतं का?

Priya Bapat Birthday Special : प्रिया बापट अभिनयासोबतच ‘या’ कलेत आहे पारंगत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version