कर्मचारी आणि जनता वाऱ्यावर, महाराष्ट्र खड्यात टाकण्याचं षडयंत्र!, केदार दिघेंचा हल्लबोल

नवीन वर्षाची सुरुवात तर झाली परंतु राज्यातील जनतेचे प्रश्न काही सुटण्याचे नाव घेत नाही. नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडले आणि नव्या वर्षाची सुरवात झाली.

कर्मचारी आणि जनता वाऱ्यावर, महाराष्ट्र खड्यात टाकण्याचं षडयंत्र!, केदार दिघेंचा हल्लबोल

नवीन वर्षाची सुरुवात तर झाली परंतु राज्यातील जनतेचे प्रश्न काही सुटण्याचे नाव घेत नाही. नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडले आणि नव्या वर्षाची सुरवात झाली. पण जनतेच्या प्रश्नांवर काही तोडगा मात्र निघाला नाही. राज्यात २ जानेवारी २०२३ पासून निवासी डॉक्टर्स संपावर आहेत, मध्यरात्रीपासून महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी संपावर आहेत तर काळ अंगणवाडीतील महिलांनी देखील आझाद मैदान परिसरात संप पुकारला होता. अनेक प्रश्न आहेत पण हे प्रश्न मार्गी कसे लागणार असे अनेकांना प्रश्न आहेत. आणि आता या वादात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी उडी घेतली आहे.

 केदार दिघे यांनी या संदर्भात ट्विट करत सरकार हल्लाबोल केला आहे. ते त्यांच्या ट्विट मध्ये म्हणाले आहेत कि, महावितरण असो, निवासी डॉक्टर संप किंवा अंगणवाडी महिलांचा संप, सरकार प्रत्येक गोष्ट गृहीत धरत आहे. महाराष्ट्रच दुर्दैव, काहींच्या फायद्यासाठी कर्मचारी आणि जनता वाऱ्यावर आणि महाराष्ट्र खड्यात टाकण्याच षडयंत्र! #महाराष्ट्र #वाचवा …
#mahavitaran

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर (Mahavitaran Strike) आहेत.महावितरणच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील ठाणे, मुलुंड, भांडुप, नवी मुंबई, बेलापूर, पनवेल, तळोजा व उरणमध्ये अदानी वीज (Adani Group) कंपनीला वितरणाचा परवाना देऊ नये आदी मागण्यांसाठी ४ जानेवारीपासून महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ३० संघटनांनी हा संप पुकारला आहे. राज्यातून एकूण ८६ हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी व ४२ हजार कंत्राटी कामगार आणि सुरक्षा रक्षकांनी तब्बल ७२ तासांचा संप पुकारला आहे. ४,५ व ६ जानेवारी असा ३ दिवस हा संप असणार आहे. मध्यरात्री पासून कर्मचारी हे संपावर आहेत आणि त्यांच्या या संपाचा फटका नागरिकांना बसला आहे. अनेक परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच २ जानेवारी २०२३ पासून राज्यातील निवासी डॉक्टर्स देखील संपावर आहेत. – वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी १,४३२ पदांची निर्मिती, सहयोगी आणि सहायक प्राध्यापकांची पदे भरणे, महागाई भत्त्याची थकबाकी देणे तसेच सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करणे आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील असमानता दूर करणे अश्या अनेक मागण्यांसह राज्यातील निवासी डॉक्टर्स संपावर आहेत. तर काल मुंबईतील आझाद मैदानावर अंगण वाडीतील महिलांनी देखील त्यांच्या मागण्यांसह संप पुकारला आहे.

हे ही वाचा:

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’बद्दल धक्कादायक बातमी! आता १४ वर्षांनंतर दिग्दर्शकानेही सोडला शो, कारण वाचून वाटेल आश्चर्य

Shark Tank Season 2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला , अश्नीर ग्रोव्हर आणि गझल अलघच्याजागी दिसणार हे परीक्षक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version