spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mahavitaran Strike , महावितरण कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या कोणकोणत्या आहेत ?

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर (Mahavitaran Strike) आहेत. ४ जानेवारीपासून महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ३० संघटनांनी हा संप पुकारला आहे.

Mahavitaran Strike : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर (Mahavitaran Strike) आहेत. ४ जानेवारीपासून महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ३० संघटनांनी हा संप पुकारला आहे. राज्यातून एकूण ८६ हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी व ४२ हजार कंत्राटी कामगार आणि सुरक्षा रक्षकांनी तब्बल ७२ तासांचा संप पुकारला आहे. ४,५ व ६ जानेवारी असा ३ दिवस हा संप असणार आहे. हा संप सुरु झाल्यापासून नागरिकांना देखील अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनतेला समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. परंतु महावितरण कर्मचाऱ्यांच्यामार्फत जे काही आंदोलन होते आहे त्यांच्या नक्की मागण्या आहेत तरी काय ?

  • महावितरणच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
  • महाराष्ट्रातील ठाणे, मुलुंड, भांडुप, नवी मुंबई, बेलापूर, पनवेल, तळोजा व उरणमध्ये अदानी वीज (Adani Group) कंपनीला वितरणाचा परवाना देऊ नये आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
  • तिन्ही वीज कंपन्यातील असलेल्या ४२ हजाराच्या वर रिक्त पदे भरावी. ही पदे भरताना ४० हजाराच्या वर जे कंत्राटी काम करतात त्याना शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादेची अट कमी करून करून रोजंदारी कामगार म्हणून सामावून घ्यावे व साठ वर्षापर्यंत संरक्षण प्रदान करावे.
  • महानिर्मिती कंपनीच्या मालकीचे जलविद्युत केंद्र खाजगी भांडवलदारांना विक्री करता खुले करण्यात येऊ नये.
  • वीज कंपन्यांचे खाजगीकरण करू नये या प्रमुख मागणीसाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे येथे हजारोंच्या संख्येने आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारकडून कोणतीही कृती न झाल्यास संपाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे अखेर राज्यभरातील वीज वितरणचे कर्मचारी संपावर जात आहेत.

हे ही वाचा:

Watch Video, विस्कटलेले केस, सुजलेले डोळे… उर्फीची ‘ही’ अवस्था पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण!

सर्व तयारी झाली आहे, केसरकरांनी लवकरच तुरुंगात जाण्याची करावी, संजय राऊतांच्या इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss